शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

‘परिंद्यां’साठी ‘तो’ धुंडाळतोय देश!

By admin | Updated: April 1, 2016 00:12 IST

असेही झपाटलेपण : राजस्थानच्या युवकाकडून पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्यांचा आगळा शोध

नाशिक : पैशांमागे धावण्याऐवजी स्वत:च्या मनासारखे जगणारी माणसे फार थोडी असतात. असाच एक अवलिया करिअर सोडून वेगळे काही करण्यासाठी देशाचा कानाकोपरा धुंडाळतो आहे... राहुल करणपुरिया असे नाव असलेला हा तरुण पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या देशभरातील ५२ व्यक्तींचा अक्षरश: पायाला भिंगरी लावून शोध घेत असून, त्यांना उजेडात आणण्याचे काम करीत आहे. मूळ राजस्थानातील भिलवाडा येथील राहुल पालकांच्या इच्छेसाठी कर्ज काढून एमबीएचे शिक्षण घेत होता; पण त्याला पर्यावरणाची आवड असल्याने या शिक्षणात त्याचे मन लागत नव्हते. या अस्वस्थतेतूनच त्याने एमबीए अर्धवट सोडून उदयपूरच्या ‘स्वराज’ या पर्यावरणविषयक शिक्षण देणाऱ्या विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथले शिक्षण पूर्ण होत असतानाच त्याच्या डोक्यात ‘५२ परिंदे’ प्रकल्पाची कल्पना आली. पर्यावरण संवर्धनासाठी झटणारी देशातील ५२ माणसे शोधायची. त्यांच्यावर माहितीपट तयार करायचे आणि ते जगभरात पोहोचवायचे, अशी ही साधारण कल्पना. ही माणसे समोर आणल्यास त्यांच्यापासून तरुणांना प्रेरणा मिळेल, असा यामागचा उद्देश. त्यानुसार राहुलने गेल्या नोव्हेंबर महिन्यात भ्रमंतीला प्रारंभ केला. आतापर्यंत त्याने राजस्थान, हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र या राज्यांमध्ये भटकत सतरा ‘परिंदे’ शोधून काढले आहेत. महाराष्ट्रात फिरताना राहुल नुकताच नाशिकला येऊन पुण्याकडे रवाना झाला. त्याला हा प्रकल्प येत्या नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करायचा आहे. स्वस्तात स्वस्त वाहनाने प्रवास केला, तरी या प्रकल्पासाठी एक लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी राहुलने काही पैसे उभे केले आहेत,तर जाईल तेथूनही मदत मिळत आहे.