शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

हुतात्मा स्मारकाजवळच ‘देशीचा’ बार

By admin | Updated: December 10, 2015 00:02 IST

हुतात्मा स्मारकाजवळच ‘देशीचा’ बार

नाशिक : पेठ नगरपंचायत हद्दीतील हुतात्मा स्मारकापासून अवघ्या ५० फुटांच्या अंतरावर आणि एका खासगी शाळेला लागून एका खासगी जागेत देशी दारू दुकान सुरू करण्यासाठी संगनमत करण्यात येत असून, त्यास नगरपंचायत हद्दीतील ग्रामस्थांचा तीव्र विरोध असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पेठ नगरपंचायत हद्दीतील तत्कालीन पेठ ग्रामपंचायतीने केलेल्या ठरावाच्या आधारे प्लॉट क्रमांक २९० मध्ये देशी दारू दुकान सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी पेठ ग्रामपंचायतीने केलेल्या २६ जानेवारी २०१४ च्या ठरावाचा आधार घेतला जात आहे. मुळातच त्या जागेवर देशी दारूचे दुकान सुरू करण्यास ग्रामसभांमधून वेळोवेळी विरोध करण्यात आलेला आहे. परंतु संबंधित व्यक्ती गटविकास अधिकारी यांच्याशी संगनमत करून कायद्याच्या पळवाटा काढून त्याचजागेवर देशी दारूचे दुकान सुरू करू पाहत आहे. मुळातच या जागेपासून पेठ येथील अतिप्राचीन हुतात्मा स्मारक असून, प्रस्तावित देशी दारू दुकानालगतच तुळजाभवनी प्राथमिक विद्यामंदिर आहे. या शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे जवळपास ७० ते ८० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे देशी दारूचे दुकान सुरू झाल्यास त्याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांवर होण्याची शक्यता आहे. तसेच या प्रस्तावित देशी दारू दुकानासाठी या शाळेचे स्थलांतरही करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांचाही या देशी दारू दुकानास विरोध आहे. त्यामुळेच हुतात्मा स्मारक व प्राथमिक शाळा यांचे महत्त्व लक्षात घेऊन येथे देशी दारू दुकान सुरू करण्यात येऊ नये, अन्यथा आम्ही आमरण उपोषण करू, असा इशारा रख्मा पवार, कुसुम गांगुर्डे, यमुना इंपाळ, सुगंधाबाई अहिरे, हिराबाई वाघमारे, निर्मला इंपाळ, फुलाबाई मोरे, जना सातपुते, कुसुम गायकवाड, रेखा वाघ, मीराबाई राऊत, सुरेखा वाघमारे, कविता मोरे, गंगुबाई पवार, गणपत मोरे, भास्कर सातपुते, हिरामण गायकवाड, हिरामण राऊत यांच्यासह असंख्य ग्रामस्थांनी दिला आहे. (प्रतिनिधी)