शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
12
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
13
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
14
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
15
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
16
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
17
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
18
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
19
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 

कळवणला दोन फे ऱ्यांमध्ये मतमोजणी

By admin | Updated: November 2, 2015 22:58 IST

कळवणला दोन फे ऱ्यांमध्ये मतमोजणी

नगरपंचायत निवडणूक : प्रभाग एकमधून सुनीता पगार बिनविरोध; दोन ते सतरामध्ये मतदानकळवण : येथील नगरपंचायत निवडणुकीत पहिल्या फेरीत प्रभाग २ ते ८ आणि दुसऱ्या फेरीत प्रभाग ९ ते १७ या प्रभागांची मतमोजणी करण्यात आली. प्रभाग एकमधून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सुनीता कौतिक पगार या बिनविरोध निवडून आल्याची घोषणा अधिकाऱ्यांनी केली. प्रभाग क्रमांक २ : या सर्वसाधारण प्रभागातून शिवसेनेचे शहरप्रमुख साहेबराव पगार यांनी ३०१ मते मिळवून विजय मिळविला. त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे कळवण पंचायत समितीचे सदस्य तथा माजी सभापती हिरामण पगार (१७१) यांचा पराभव केला, कॉँग्रेसच्या मनोज पगार यांना १५७ मते मिळाली. प्रभाग क्र ३ : या सर्वसाधारण महिला राखीव प्रभागात भाजपाच्या भाग्यश्री पगार यांनी ३९७ मते मिळवून विजय मिळविला. त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पूनम पगार (१६८) यांचा पराभव केला. अपक्ष विमल पगार यांना ७० मते मिळाली. प्रभाग क्र. ४ : या सर्वसाधारण महिला प्रभागातून अपक्ष रंजना पगार यांनी २०२ मते मिळवून विजय मिळविला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दगुबाई पगार (१२६) यांचा पराभव केला.प्रभाग क्र .५ : या सर्वसाधारण स्त्री प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिता जैन ३३१ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी भाजपाच्या मंगला पगार (१४२) यांचा पराभव केला. प्रभाग क्र . ६ : अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या प्रभागात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे बाळू जाधव यांनी २१८ मते मिळवून विजय मिळविला. अपक्ष प्रदीप निकम (१०७) यांचा पराभव केला.प्रभाग क्र. ७ : या प्रभागातून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे कौतिक पगार यांनी सर्वाधिक ६२५ मते मिळवून विजय मिळविला. त्यांनी भाजपाचे प्रमोद पगार (१३६) यांचा पराभव केला. अपक्ष विनायक पगार यांना ५ मते मिळाली. प्रभाग क्र . ८ : या सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असलेल्या प्रभागात राष्ट्रवादी कॉँग्रेस पुरस्कृत अनिता सुनील महाजन यांनी ३१० मते मिळवून विजय मिळविला. त्यांनी महानंदा अमृतकार (२३८) यांचा पराभव केला. प्रभाग क्र. ९ : या अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव प्रभागात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या रंजनाबाई गुलाब जगताप यांनी १९९ मते मिळवून विजय मिळविला. त्यांनी भाजपाच्या अंजना जाधव (१३१) यांचा पराभव केला.प्रभाग क्र. १० : या अनुसूचित जमाती महिला राखीव असलेल्या प्रभागात कॉँग्रेसच्या रोहिणी सुनील महाले यांनी ४०१ मते मिळवून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या गजराबाई दौलत राऊत (५९) यांचा पराभव केला. प्रभाग क्र. ११ : या सर्वसाधारणसाठी असलेल्या प्रभागातून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जयेश प्रकाश पगार यांनी २७६ मते मिळवून अपक्ष किशोर कौतिकराव सूर्यवंशी (२७४) यांचा २ मतांनी पराभव केला.प्रभाग क्र. १२ : या अनुसूचित जमातीच्या प्रभागात भाजपाच्या दिलीप रामदास मोरे यांनी २७८ मते मिळवून विजय मिळविला. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे गणेश भिका माळी ( २५५) यांचा पराभव केला. कॉँग्रेसच्या संतोष राजाराम पवार यांना ४५ मते मिळाली. प्रभाग क्र . १३ : या सर्वसाधारण प्रभागात कॉँग्रेसच्या अतुल अरुण पगार यांनी २९४ मते मिळवून विजय मिळविला. त्यांनी अपक्ष विजय त्र्यंबक पगार (१५३) यांचा पराभव केला.प्रभाग क्र.१४ : या अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव असलेल्या प्रभागात भाजपाच्या सुरेखा देवराम जगताप यांनी २९८ मते मिळवून विजय मिळविला. त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या रंजना नारायण ढुमसे (५३) यांचा पराभव केला. प्रभाग क्र. १५ : हा सर्वसाधारण असलेल्या प्रभागातून भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधाकर त्र्यंबक पगार यांनी ४८२ मते मिळवून विजय मिळविला. त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नितीन रामदास पाटील (२६३) यांचा पराभव केला.प्रभाग क्र . १६ : या सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असलेल्या प्रभागातून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अनुराधा जितेंद्र पगार यांनी १९४ मते मिळवून विजय मिळविला. प्रभाग क्र. १७ : या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या प्रभागातून कॉँग्रेसच्या मयूर काशीनाथ बहिरम यांनी २५८ मते मिळवून विजय मिळविला.(वार्ताहर)