शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

तब्बल सोळा तास चालली मतमोजणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 01:22 IST

मतमोजणीसाठी तब्बल अकराशे कर्मचारी व सहायक, त्यांना सहाय्य करण्यासाठी नऊशे सहकारी व पडद्याआड झटणारे तितकेच हातांनी जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी या दोन लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी निर्धारित वेळेत पूर्ण केली.

नाशिक : मतमोजणीसाठी तब्बल अकराशे कर्मचारी व सहायक, त्यांना सहाय्य करण्यासाठी नऊशे सहकारी व पडद्याआड झटणारे तितकेच हातांनी जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी या दोन लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी निर्धारित वेळेत पूर्ण केली. नाशिक मतदारसंघाची मोजणी रात्री अडीच वाजता, तर दिंडोरी मतदारसंघाने साडेदहा वाजता पूर्ण करून विजयी उमेदवारांच्या हाती प्रमाणपत्र बहाल केल्यानंतर संपूर्ण निवडणूक प्रकियाच शांततेत व निर्विघ्न पार पडल्याबद्दल सुटकेचा श्वास सोडला.२९ एप्रिल रोजी मतदान पार पडल्यानंतर जिल्ह्यातील मतदान यंत्रे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून थेट अंबडच्या सेंट्रल वेअर हाऊसच्या स्ट्रॉँगरूममध्ये ठेवण्यापर्यंत राबलेल्या निवडणूक यंत्रणेला त्यानंतरही चोख काळजी घ्यावी लागली. देशभरातून ईव्हीएम यंत्रे हॅक व चोरीला जाण्याच्या घटनांच्या वृत्ताने वेअर हाउसची सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागले, यंदा पहिल्यांदाच उमेदवारांनी निवडणूक यंत्रणेवर अविश्वास प्रकट करीत वेअर हाउसच्या बाहेर स्वत:ची खासगी सुरक्षा व्यवस्था ठेवली. निवडणूक पूर्व एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर व्यक्त होणारी मते-मतांतरे व त्यातून निर्माण झालेला राजकीय तणाव पाहता, प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी त्याचे काय पडसाद उमटतील याची चिंता निवडणूक यंत्रणा व पोलीस खात्यालाही भेडसावली. अशा परिस्थितीत गुरुवारी सकाळी ८ वाजता नाशिक व दिंडोरी मतदारसंघाची मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. प्रारंभी पोस्टल मतपत्रिकांची मोजणी करण्यास सुरुवात झाली, परंतु तिथे निवडणूक आयोगाच्या सर्व्हरमध्येच तांत्रिक बिघाड झाल्याने अधिकारी व मोजणी करणारे कर्मचारीही घाबरले. एकीकडे निवडणूक आयोगाकडून सातत्याने होणारी विचारणा व त्यात निर्माण झालेल्या तांत्रिक दोषामुळे साधारणत: दोन तासानंतर प्रयत्न थांबविण्यात आले. याच दरम्यान, निवडणूक निरीक्षक, उमेदवारांचे प्रतिनिधीसमक्ष मतदान यंत्रे ठेवलेल्या स्ट्रॉँग रूमचे सील काढण्यात येऊन मतमोजणीला सुरुवात करण्यात आली.पोस्टल मतपत्रिकेतही पवार, गोडसेंना पसंतीसकाळी ८ वाजेपर्यंत नाशिक मतदारसंघासाठी ३५३९ पोस्टल मतपत्रिका प्राप्त झाल्या होत्या, त्यांची मोजणी सकाळी ८ वाजेपासून सुरू करण्यात आली. परंतु आयोगाच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतमोजणी थांबविण्यात आली होती, दुपारनंतर नवीन सॉफ्टवेअर तयार करण्यात येऊन मोजणी करण्यात आली. त्याचा निकाल मात्र तब्बल १२ तासाने जाहीर झाला, त्यात गोडसे यांना १५६४, तर भुजबळ यांना ५४१ मते मिळाली. पवन पवार यांना १४५, तर कोकाटे यांना २९८ मते मिळाली. या मोजनीत ८६० मते अवैध ठरली. दिंडोरी मतदारसंघासाठी पोस्टल मतपत्रिका २९७० प्राप्त झाल्या होत्या. त्याची मोजणी सकाळी सुरू करण्यात आली असली तरी निकाल मात्र रात्री पावणेनऊ वाजता जाहीर करण्यात आला. त्यात भारती पवार यांना २०१८, धनराज महाले यांना ५८० व गावित यांना ८५ मते मिळाली. १८ मतदारांनी नोटाचा वापर केला, तर ९३ मते अवैध ठरली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnashik-pcनाशिक