शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणी प्रक्रिया शांततेत पडली पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 01:46 IST

शहरासह जिल्ह्यात मतदानप्रक्रियेसह मतमोजणीही गुरुवारी (दि.२३) शांततेत पार पडली. शहर पोलीस आयुक्तालय व ग्रामीण पोलीस मुख्यालयस्तरावर सुक्ष्म नियोजन करत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कायदासुव्यवस्था अबाधित राहिली.

नाशिक : शहरासह जिल्ह्यात मतदानप्रक्रियेसह मतमोजणीही गुरुवारी (दि.२३) शांततेत पार पडली. शहर पोलीस आयुक्तालय व ग्रामीण पोलीस मुख्यालयस्तरावर सुक्ष्म नियोजन करत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कायदासुव्यवस्था अबाधित राहिली. नाशिककर जनतेने पोलीस प्रशासनाच्या कामगिरीविषयी समाधान व्यक्त केले आहे. शहरासह जिल्ह्यात निमलष्करी दलाच्या जवानांसह राज्य राखीव दलाच्या तुकड्या व अतिरिक्त पोलिसांचा फौजफ ाटा पहारा देत होता.शहर व ग्रामीण भागात २९ एप्रिलरोजी लोकसभा निवडणुकीची मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली. यावेळी तीन हजारांपेक्षा अधिक पोलीसांचे बळ तैनात करण्यात आले होते. गुरुवारी शहरासह ग्रामीण भागातील मतदानाची मोजणी करण्यात आली. निवडणुकांचे निकाल जाहीर होणार असल्याने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी तत्पूर्वी सूक्ष्म नियोजन करत सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक पोलीस आपापल्या हद्दीत तैनात केले होते.गुरुवारी सकाळी मतमोजणीला प्रारंभ होऊन रात्री उशिरापर्यंत शांततेत मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. निकाल स्पष्ट होण्याची चिन्हे दिसताच उमेदवार व कार्यकर्ते केंद्रातून बाहेर पडले. रात्री उशिरा बारा वाजता मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होताच पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.संवेदनशील भागावर नजरपोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांना ‘अ‍ॅलर्ट’देत नांगरे-पाटील यांनी सराईत गुन्हेगारांची धरपकड करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. शहरात सर्वत्र चोख बंदोबस्तात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत होती. तसेच शहरातील पंचवटी, भद्रकाली, अंबड, सातपूर, नाशिकरोड, इंदिरानगर यांसारख्या पोलीस ठाणेहद्दीतील संवेदनशाील भागावर पोलिसांची विशेष नजर होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnashik-pcनाशिक