नाशिक : जिल्हा व सत्र न्यायालयाने मागणी केलेल्या पोलीस मुख्यालयातील पाच एकर जागेपैकी पोलिसांनी तयारी दाखविलेल्या अडीच एकर जागेचे येत्या १० मार्चला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरुण ढवळे यांच्या उपस्थितीत सीमांकन केले जाणार आहे़ मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक व प्रभू देसाई यांच्या खंडपीठापुढे १६ मार्चला हा सीमांकन अहवाल सादर केला जाणार आहेत़ उच्च न्यायालयात सुरू असलेल्या जनहित याचिकेवर सीमांकन अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे आदेश सरकारला देण्यात आले होते़नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयास दिवसेंदिवस जागा अपुरी पडत असून, विस्ताराची मागणी अनेक वर्षांपासून केली जाते आहे़ त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर गत शुक्रवारी (दि़१०) सुनावणी झाली़ यामध्ये महाधिवक्ता देव यांनी पोलीस मुख्यालयातील पाच एकरपैकी अडीच एकर जागा जिल्हा न्यायालयास देण्यास तयार असल्याचे सांगितले होते़ त्यावर खंडपीठाने पोलीस मुख्यालयातील कोणती जागा न्यायालयासाठी हस्तांतरित करणार त्याचे सीमांकन व हस्तांतरण अहवाल सादर करण्याचे आदेश सरकारला दिले होते़
पोलीस आयुक्तालयातील अडीच एकरची १० मार्चला मोजणी
By admin | Updated: February 16, 2017 17:01 IST