शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:57 IST

गेल्या दीड महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या प्रशासकीय कामात व्यस्त असलेल्या महसूल कर्मचारी, अधिकाऱ्यांनी निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर सुटकेचा श्वास घेऊन कुटुंबासह उन्हाळी सुटी घालविण्यासाठी रजा टाकून जाणे पसंत केल्याची बाब निवडणूक यंत्रणेला खटकली

नाशिक : गेल्या दीड महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या प्रशासकीय कामात व्यस्त असलेल्या महसूल कर्मचारी, अधिकाऱ्यांनी निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर सुटकेचा श्वास घेऊन कुटुंबासह उन्हाळी सुटी घालविण्यासाठी रजा टाकून जाणे पसंत केल्याची बाब निवडणूक यंत्रणेला खटकली असून, निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया २७ मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश असल्याचे सांगून निवडणुकीशी संबंधित महसूल अधिकारी, कर्मचाºयांना कोणत्याही प्रकारच्या रजा मंजुरीवर मज्जाव घालण्यात आला आहे.या संदर्भात दोन दिवसांपूर्वीच उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्तसहायक निवडणूक निर्णय अधिकाºयांना पत्र पाठवून आयोगाच्या पत्राची जाणीव करून दिली आहे.लोकसभा निवडणुकीचे मतदान २९ एप्रिल रोजी पार पडल्यानंतर या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी करण्यापासून ते मतदार यादी तयार करणे, मतदारांपर्यंत ओळखपत्र, निवडणूक चिठ्या पोहोचविण्यापर्यंत त्याचबरोबर मतदान केंद्राची सर्व तयारी करण्यात महसूल अधिकारी व कर्मचारी गेल्या दीड महिन्यांपासून गुंतून पडले होते. या काळात त्यांना साप्ताहिक सुटी अथवा घोषित झालेल्या शासकीय सुट्याही घेणे अवघड होऊन बसले होते. निवडणूक कामाला प्राधान्य देण्याचे आयोगाचे आदेश असल्याने महसूल अधिकारी, कर्मचाºयांनी लोकसभा निवडणूक यशस्वीरीत्या पार पाडली.मतदानाच्या दिवशी व दुसºया दिवशी सलग ४८ तास काम केलेल्या या अधिकारी, कर्मचाºयांनी निवडणूक आटोपल्यानंतर मात्र थकवा घालविण्यासाठी कुटुंबीयांसह बाहेरगावी जाण्याची तयारी करून मुख्यालय सोडण्याची परवानगीही घेतली, तर काहींनी नातेवाइकांच्या लग्न समारंभासाठी सुट्या टाकल्या. परंतु, त्यांच्या सुटीवर जाण्याने निवडणूक संदर्भातील कामे खोळंबू लागल्याचे निदर्शनास आले आहे.आयोगाकडून मतदान व मतमोजणी संदर्भातील कोणतीही माहिती तत्काळ मागविली जात असून, संबंधित अधिकारी, कर्मचारी रजेवर गेल्यामुळे माहिती मिळत नसल्याने अडचण निर्माण होत असल्याचे पाहून यापुढे उप जिल्हा निवडणूक अधिकाºयांची पूर्व परवानगीशिवाय निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवडणूक कामाशी नियुक्त केलेले नायब तहसीलदार, लिपिक यांच्या रजा मंजूर करण्यात येऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणूक यंत्रणेच्या या सूचनेमुळे रजेवर गेलेल्या अधिकारी, कर्मचाºयांना परत बोलविण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९nashik-pcनाशिक