शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बनावट औषधे विक्रेत्यांना अभय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 00:22 IST

द्राक्ष उत्पादकांना बनावट औषधांची महागड्या किमतीत विक्री करून फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी हाती लागण्याच्या आतच पोलीस यंत्रणेने तपास गुंडाळल्यामुळे द्राक्ष उत्पादकांना यंदाही दिलासा मिळण्याची शक्यता कमी असून, शहरातील कॅनडा कॉर्नर येथील परफेक्ट इन्स्ट्रूमेंट कार्पोरेशन या कंपनीकडून बनावट औषधांचा मोठा साठा जप्त करूनही त्याच्या मुळाशी जाणे टाळल्यामुळे या गुन्ह्यातील आरोपी व सूत्रधार तूर्त मोकळे फिरत आहेत.

ठळक मुद्देद्राक्ष उत्पादकांची फसवणूक : फरफेक्ट कंपनीचा तपास गुंडाळला

नाशिक : द्राक्ष उत्पादकांना बनावट औषधांची महागड्या किमतीत विक्री करून फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी हाती लागण्याच्या आतच पोलीस यंत्रणेने तपास गुंडाळल्यामुळे द्राक्ष उत्पादकांना यंदाही दिलासा मिळण्याची शक्यता कमी असून, शहरातील कॅनडा कॉर्नर येथील परफेक्ट इन्स्ट्रूमेंट कार्पोरेशन या कंपनीकडून बनावट औषधांचा मोठा साठा जप्त करूनही त्याच्या मुळाशी जाणे टाळल्यामुळे या गुन्ह्यातील आरोपी व सूत्रधार तूर्त मोकळे फिरत आहेत.नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. द्राक्षाची बाग घेण्यासाठी येणारा खर्च व त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा शेतकरी ताळमेळ लावत असतात. मात्र बºयाच वेळा अस्मानी संकटामुळे मोठे नुकसानही त्यांना सोसावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांकडून द्राक्षबागांची काटेकोरपणे काळजी घेतली जात असल्याचे पाहूनच द्राक्षबागांसाठी लागणारी विविध प्रकारची औषधे पुरविणाºया कंपन्या उदयास आल्या असून, त्यात प्रामुख्याने मण्यांची फुगवणी व आकार वाढविण्यासाठी सीपीपीयू व पीजीआर ही औषधे गुणकारी ठरली आहेत. मात्र याच औषधांच्या नावाने बनावट औषधे तयार करून त्यांची खुलेआम विक्री करण्याचा प्रकार दोन महिन्यांपूर्वी कृषी विभागाच्या भरारी पथकाने हाणून पाडला होता. नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर येथे मे. परफेक्ट इन्स्ट्रूमेंट कार्पोरेशन या दुकानात व गुदामातून सुमारे चौदा लाख रुपये किमतीचा बनावट व विनापरवाना औषधांचा साठा जप्त करण्यात आला होता.बनावट औषधांची विक्री करून शेतकºयांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी कृषी विभागाने केलेल्या कामगिरीचे शेतकरी वर्गाकडून स्वागत करण्यात येऊन या प्रकरणी कृषी विभागाने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुकान मालक राजेंद्र मोदी याच्या विरुद्ध तक्रार दिली होती. त्यानुसार फसवणूक व कीटकनाशक विक्री कायद्याचे उल्लंघन या कायद्यान्वये मोदी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात मोदी याचा सहकारी भानुशाली नामक व्यक्तीलाही अटक करण्यात आली. मात्र पोलिसांनी एक दिवसाच्या पोलीस कोठडीत जुजबी विचारपूस करून गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी हात आखडता घेतला.परिणामी दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने ते खुलेआम फिरत आहेत. परंतु शेतकºयांच्या अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला औषधांचा साठा आरोपींनी कोठून मिळविला, त्यांनी कोठे कोठे त्याची विक्री केली, औषधे तयार करण्यासाठी कच्चा माल कोठून आणला या साºया बाबी गुलदस्त्यातच आहेत.त्यामुळे कृषी खात्याने कारवाई करूनही निव्वळ पोलीस खात्याच्या दुर्लक्षामुळे द्राक्ष उत्पादकांच्या फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश होऊ शकलेला नाही.कीटकनाशक विक्री कायद्याचे उल्लंघनबनावट औषधांची विक्री करून शेतकºयांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी कृषी विभागाने केलेल्या कामगिरीचे शेतकरी वर्गाकडून स्वागत करण्यात येऊन या प्रकरणी कृषी विभागाने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुकान मालक राजेंद्र मोदी याच्या विरुद्ध तक्रार दिली होती. त्यानुसार फसवणूक व कीटकनाशक विक्री कायद्याचे उल्लंघन या कायद्यान्वये मोदी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात मोदी याचा सहकारी भानुशाली नामक व्यक्तीलाही अटक करण्यात आली. मात्र पोलिसांनी एक दिवसाच्या पोलीस कोठडीत जुजबी विचारपूस करून गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी टाळाटाळ केल्याचे बोलले जाते.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र