शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मोजणीत अडकला वन कायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:39 IST

नाशिक : अतिक्रमित जमिनीचा ताबा आदिवासींना देण्याच्या केंद्र सरकारच्या वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीत आदिवासींच्या ताब्यातील जागेच्या मोजणीचा मोठा अडसर निर्माण झाला आहे. परिणामी साडेसतरा हजार वनदाव्यांना जिल्हास्तरीय समितीने २००८ मध्ये मंजुरी दिली असली तरी, आदिवासींच्या ताब्यात प्रत्यक्ष असलेली जमीन व जिल्हास्तरीय समितीने देऊ केलेल्या जमिनीचा ताबा याच्यातील तफावतीमुळेच गेल्या दहा वर्षांपासून कायद्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही.

ठळक मुद्देदहा वर्षांपासून कायद्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही.उद्रेक मुंबईपर्यंत काढलेल्या पायी मोर्चातून झाला

नाशिक : अतिक्रमित जमिनीचा ताबा आदिवासींना देण्याच्या केंद्र सरकारच्या वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीत आदिवासींच्या ताब्यातील जागेच्या मोजणीचा मोठा अडसर निर्माण झाला आहे. परिणामी साडेसतरा हजार वनदाव्यांना जिल्हास्तरीय समितीने २००८ मध्ये मंजुरी दिली असली तरी, आदिवासींच्या ताब्यात प्रत्यक्ष असलेली जमीन व जिल्हास्तरीय समितीने देऊ केलेल्या जमिनीचा ताबा याच्यातील तफावतीमुळेच गेल्या दहा वर्षांपासून कायद्याची अंमलबजावणी होऊ शकलेलीनाही.नाशिक जिल्ह्णात वनहक्क कायद्यान्वये प्रारंभी ५०,४४३ दावे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी उपविभागीय अधिकाºयांकडे ४९,७६९ दावे तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यातील फक्त १८,२३५ दावे उपविभागीय अधिकाºयांनी मान्य करून सुमारे ३१,५३४ दावे नामंजूर करण्यात आले. उपविभागीय अधिकाºयांनी त्यांच्याकडील १८,२३५ दावे जिल्हास्तरीय समितीकडे मान्यतेसाठी पाठविले असता, समितीने त्यातील १७,५५१ दावे मंजूर केले व ६८४ दावे नामंजूर केले. जिल्हास्तरीय समितीने त्यातील ९७५ आदिवासींना प्रत्यक्षात ताबा प्रमाणपत्र तयार करून २६,८९९ एकर जागा आदिवासींच्या ताब्यात दिली आहे.परंतु अशी जागा ताब्यात देताना आदिवासींचा प्रत्यक्षात जमिनीवर असलेला ताबा व जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेले क्षेत्र यात प्रचंड तफावत निर्माण झाल्यामुळे आदिवासींनी ताबा प्रमाणपत्र स्वीकारण्यास नकार दिला व फेरमोजणीची मागणी केली. गेल्या सात ते आठ वर्षांपासून किसान सभेच्या माध्यमातून पेठ, सुरगाणा, कळवण, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, हरसूल, इगतपुरी या तालुक्यांतील आदिवासींनी वेळोवेळी मोर्चे, रास्ता रोको, धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. परंतु प्रत्येक वेळी त्यांना आश्वासनाच्या पलीकडे काहीच मिळाले नाही. आदिवासींना त्यांच्या ताब्यातील जमिनीची नोंद सातबारा उताºयावर होत नाही तोपर्यंत त्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात शासकीय मदतीपासूनही वंचित राहावे लागत असल्याने त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला होता व त्यातूनच त्याचा उद्रेक मुंबईपर्यंत काढलेल्या पायी मोर्चातून झाला आहे.