शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सुरत-हैदराबाद महामार्गासाठी निफाड, सिन्नर तालुक्यात मोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 00:23 IST

नायगाव : नागपूर समृद्धी महामार्गानंतर नाशिक जिल्ह्यातून आता सुरत -हैदराबाद राष्ट्रीय महामार्गही जाणार असून, केंद्रीय पथकाकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जिल्ह्यात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. निफाड व सिन्नर तालुक्याच्या काही भागात या मोजणीचे काम सुरू झाल्याने शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देनिफाड तालुक्यातून पुढे हा मार्ग सिन्नर तालुक्यातील पाटपिंप्री मार्गे जाणार आहे.

 

हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाची मोजणी झालेल्या ठिकाणी निशाणी म्हणून लावलेले सीमेंटचे ब्लाँक दाखविताना संतोष बोडके, साहेबराव बोडके, मुरलीधर कातकाडे, शंकर बोडके, शिवाजी बोडके, राजू जाधव आदी शेतकरी.

 

नायगाव : नागपूर समृद्धी महामार्गानंतर नाशिक जिल्ह्यातून आता सुरत -हैदराबाद राष्ट्रीय महामार्गही जाणार असून, केंद्रीय पथकाकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जिल्ह्यात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. निफाड व सिन्नर तालुक्याच्या काही भागात या मोजणीचे काम सुरू झाल्याने शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे.नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या सुरत ते हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गासाठी निफाड तालुक्यातील सावळी, पिंपळगाव निपाणी आदी गावांच्या शिवारातून गुरुवार पासून मोजणीला सुरू झाली असून, मोजणी झालेल्या ठिकाणी सीमेंट ब्लॉक बसविण्याचे काम सुरू आहे. मोजणीच्या कामामुळे परिसरातील शेतकºयांमध्ये खळबळ उडाली आहे.निफाड तालुक्यातून पुढे हा मार्ग सिन्नर तालुक्यातील पाटपिंप्री मार्गे संगमनेर तालुक्यातील लोणी, राहुरी विद्यापीठ , सडे, खंबाळा, वांबोरी मार्गे नगर तालुक्यात हा राष्टÑीय महामार्ग जाणार आहे.सदरचा राष्ट्रीय महामार्ग केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयामार्फत केला जाणार असून, जिल्ह्यातील शेकडो एकर जमिनी या महामार्गात जाणार असल्याचे बोलले जात आहे. किमी लांबीत होणाºया या महामार्गाची रु ंदी तब्बल १२० मीटर राहणार आहे. मात्र यासाठी २५० मीटर रुंदीचे भूसंपादन केले जाणार आहे. सदरचा महामार्ग जमिनीपासून सुमारे १५ फूट उंचीवर राहणार आहे.या महामार्गाच्या कामासाठी केंद्रीय पथकाकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जिल्ह्यात सर्वेक्षण सुरू करण्यातआले आहे. नगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील काही गावांत सर्वेक्षण झाले आहे. (पान ३ वर)मागील आठवड्यात लोणी, राहुरी विद्यापीठ, सडे, खंडाळा, वांबोरी ते नगर तालुक्यातील मांजरसुंबा, पिंपळगाव माळवी, शेंडी , पोखर्डी, पिंपळगाव उज्जैनी, कापूरवाडी ते वाळुंजपर्यंत सर्वेक्षण करण्यात येऊन सीमेंटचे ब्लॉक लावण्यात आले आहेत. निफाड तालुक्यातील सावळी येथील निवृत्ती हरी बोडके, राजेंद्र एकनाथ बोडके, मंगला भीमराव दराडे, साहेबराव फकिरा सानप, संपत फकिरा सानप, साहेबराव सबाजी बोडके, पांडुरंग एकनाथ बोडके, खंडेराव दामू बोडके, शिवाजी बळवंत जाधव, शिवाजी फकिरा सानप, मुरलीधर सबाजी बोडके, भाऊसाहेब लक्ष्मण बोडके, भाऊसाहेब मुरलीधर कदम, काशीनाथ भिकाजी बोडके, चंद्रभान हरी बोडके आदी शेतकºयांच्या शेतात पिवळ्या रंगाचे जीपीएस जी टु असे लिहिलेले ब्लाँक बसविले आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकºयांमध्ये या महामार्गाच्या संभाव्य कामामुळे बागायती क्षेत्र असलेले अनेक शेतकरी भूमिहीन होणार असल्याचे मोजणीच्या निशाणीवरून दिसत असल्याने खळबळ उडाली आहे. सुरत-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाची सावळी व पिंपळगाव निपाणी या ठिकाणी मोजणी सुरू आहे. मात्र या परिसरातील शेतकºयांना मोजकेच क्षेत्र असून सर्वच बागायती आहे. आमच्या बागायती क्षेत्रातून हा मार्ग जात असल्यानेआम्ही या मार्गाला इंचभरही जागा देणार नाही.- राजेंद्र बोडके, साहेबराव बोडके,शेतकरी, सावळी, ता. निफाड