शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

युनोत भारताच्या सदस्यत्वासाठी काठमांडूत परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 16:37 IST

नाशिक : संयुक्त राष्ट्रात भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर जनमानस तयार करण्याच्या उद्देशाने इंडो-नेपाळ आंतरराष्ट्रीय समरसता मंचतर्फे काठमांडू येथे २८ डिसेंबरला २० देशांतील नागरिकांची आंतरराष्ट्रीय परिषद अयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत साहित्यिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाºया व्यक्तींचा समावेश असून, महाराष्ट्रातून सहभागी होणाºया १२५ तज्ज्ञांच्या ...

नाशिक : संयुक्त राष्ट्रात भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर जनमानस तयार करण्याच्या उद्देशाने इंडो-नेपाळ आंतरराष्ट्रीय समरसता मंचतर्फे काठमांडू येथे २८ डिसेंबरला २० देशांतील नागरिकांची आंतरराष्ट्रीय परिषद अयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत साहित्यिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाºया व्यक्तींचा समावेश असून, महाराष्ट्रातून सहभागी होणाºया १२५ तज्ज्ञांच्या समितीचे नेतृत्व गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्राचार्य डॉ. एम. एम. गोसावी करणार आहेत. डॉ. गोसावी यांच्यावर प्रमुख सल्लागाराची जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती नेपाळच्या उपराष्ट्रपतींचे सल्लागार महावीर तोरडी यांनी दिली.सपट अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तोरडी म्हणाले, सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्रात मताधिकार अधिकारांसह कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्यासाठी मित्रराष्ट्रांना प्रोत्साहित करून त्यांचे समर्थन प्राप्त करणे गरजेचे आहे. समरसता अभियांनाच्या माध्यमातून आतापर्यंत वीस देशांना प्रोत्साहित करण्यात आले असून यात अफगाणिस्तान, अल्जेरिया, एंगोला, आॅस्ट्रिया, क्रोटीया, फिनलँड, फिन्नीश, जर्मन, इराक, इस्त्रायल, मैकडोनिया, मोरक्को, नेदरलँड, नायजेरिया, नॉर्वेजियन, रोमानिया, तुनिशिया, नेपाळ आणि भूतान या राष्ट्रांचा समावेश आहे. या परिषदेच्या माध्यमातून भारत आणि नेपाळच्या असलेल्या समतुल्य परंपरांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेत आशिया खंडाचे नेतृत्व चीनऐवजी भारताकडे सोपविण्याचा प्रस्तावही तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जगभरात भारत आठवे शक्तिशाली राष्ट्र असताना एक शांतीपूर्ण राष्ट्र अशी भारताची ओळख आहे. भारतातील ऊर्जा, संरक्षण शक्ती, लोकसंख्या आणि औद्योगिकीकरणातून देशाला ताकद मिळत असून, जगभरात भारताची सैन्य शक्ती सातव्या, ऊर्जाक्षमता विसाव्या आणि परराष्ट्र व्यवहार ११व्या स्थानी आहे. पहिल्या महायुद्धात भारताचे साडेसात हजार शांतता सैनिक शहीद झाले असून, सध्याही भारताचे सर्वाधिक शांतता सैनिक आहेत. त्यामुळेच सुरक्षा परिषदेतील अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स यांच्यासोबत आशियाचे नेतृत्व करणाºया चीनऐवजी भारताला स्थान मिळावे, असा प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे तोरडी यांनी सांगितले.