शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांचा खर्च शासकीय यंत्रणांच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 01:56 IST

राज्य सरकारच्या १३ कोटी वृक्ष लागवडीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत नाशिक जिल्ह्णातील वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टात पुन्हा ५ लाखांची भर घालण्यात आली असली तरी, सुमारे ७७ लाख वृक्ष लागवडीसाठी उन्हाळ्यापूर्वी खड्डे खणण्यासाठी शासनाकडून मात्र एक रुपयाही अनुदान देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने खड्डे खणण्यासाठी आता अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वर्गणी गोळा करण्याची वेळ आली आहे.

नाशिक : राज्य सरकारच्या १३ कोटी वृक्ष लागवडीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत नाशिक जिल्ह्णातील वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टात पुन्हा ५ लाखांची भर घालण्यात आली असली तरी, सुमारे ७७ लाख वृक्ष लागवडीसाठी उन्हाळ्यापूर्वी खड्डे खणण्यासाठी शासनाकडून मात्र एक रुपयाही अनुदान देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने खड्डे खणण्यासाठी आता अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वर्गणी गोळा करण्याची वेळ आली आहे.  जुलै महिन्यात राज्यात एकाच वेळी सर्वत्र वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्याचे नियोजन आत्तापासूनच सुरुवात करण्यात आले असून, सचिवांमार्फत वेळोवेळी त्याचा आढावाही घेण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्णासाठी शासनाने अगोदर ७२ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले होते. त्यातील ७० लाख वृक्ष लागवड एकट्या वन विभागाकडून करण्यात येणार असून, जिल्हा परिषद, बांधकाम खाते, महसूल विभाग यांसारख्या विभागांच्या माध्यमातून दोन लाख लागवड करण्यात येणार आहे.लागवडीसाठी सामाजिक वनीकरण व वन खात्याकडून रोपे पुरविण्यात येणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षलागवडीसाठी लागणाºया जागेची अडचण सोडविण्यासाठी वन खात्याला जागा शोधण्यास सांगण्यात आले असून, नद्या, नाल्यांच्या पात्रात तसेच मोकळी मैदाने, शाळांचे कुंपण आदी जागांवर वृक्षलागवड करता येणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकाºयांनी बोलतानाही खड्डे खणण्यासाठी पैसे नसल्याचे सांगून सामाजिक उपक्रमातून खड्डे खणावेत, असा सल्ला यंत्रणांना दिला आहे. त्यामुळे त्या शासकीय कार्यालयांना शासनाच्या वृक्षलागवडीसाठी कराव्या लागणाºया खड्ड्यांचा खर्च करण्याची वेळ आली असून, अधिकारी, कर्मचाºयांनी स्वत:च्या खिशातून वर्गणी गोळा करण्यास सुरुवात केली आहे. काही कार्यालयांनी ठेकेदारांना यासाठी गळ घातली असून, काहींनी शासकीय कामासाठी कार्यालयात येणाºया नागरिकांनाच ‘सढळ हस्ते’ मदतीची याचना करण्याची विनंती केली आहे. शासनाच्या उपक्रम यशस्वीतेसाठी मात्र नागरिकांच्या खिशाला चट्टी बसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.उद्दिष्ट दिले मात्र पैसा मिळणार नाहीच्पावसाळ्यात वृक्षलागवडीचा प्रत्यक्ष कार्यक्रम असला तरी, यंत्रणांनी उन्हाळ्यातच खड्डे खणावेत, असे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. जिल्ह्णात वृक्षलागवडीची तयारी केली जात असताना शासनाने पुन्हा पाच लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट नव्याने वाढवून दिल्याने आता जिल्ह्णात ७७ लाख रोपांची लागवड केली जाईल. तथापि, ज्या ज्या यंत्रणांना उद्दिष्ट ठरवून देण्यात आले, त्या यंत्रणांना वृक्षलागवडीसाठी खड्डे खणण्यास पैसा मात्र दिला जाणार नाही.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयforest departmentवनविभाग