सातपूर : केंद्रीय अंदाजपत्र वित्तीय त्रुटीचे असून, पायाभूत सुविधांवर या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. दीर्घकालीन दृष्टिकोनातू तूट वाढली आहे, असे वाटत असले तरी पायाभूत सुविधांवर खर्च होत असल्याने हे अंदाजपत्रक स्वागतार्ह आहे, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर चितळे यांनी केले. निमा कार्यालयात निमा, आयमा, महाराष्ट्र चेंबर्स, टॅक्स प्रॅक्टीशनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चासत्रात ते बोलत होते. चितळे यांनी प्रारंभी अंदाजपत्रकाची राजकीय पार्श्वभूमी विशद केली. भारतात दीर्घकालीन नियोजनाचा अभाव असल्याने त्याचा औद्योगिक विकासावर परिणाम होत असतो. या अंदाजपत्रकात सोन्याविषयी त्रिसूत्री योजना, काळ्यापैशाबाबत केलेल्या कठोर तरतुदी स्पष्ट करून अंदाजपत्रकात १ एप्रिल २0१६ पासून जीएमटी करप्रणाली कायदा लागू करण्याचा सरकारचा मानस असला, तरी त्यासंबंधी प्रत्यक्षात त्या लागू करण्यास येणाऱ्या अडचणी विशद केल्या. अंदाजपत्रकातील सकारात्मक व नकारात्मक बाजू मांडल्या. यावेळी उपस्थितांनी उपस्थित केलेल्या शंकांचे समाधानही त्यांनी केले. यावेळी व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष रवि वर्मा, चेंबर्सचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, आयमाचे सरचिटणीस राजेंद्र अहिरे, टॅक्स प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सतीश बूब, मनोज पिंगळे, सोनी आदि उपस्थित होते. प्रास्ताविक रवि वर्मा यांनी केले. मनोज पिंगळे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन राजेंद्र अहिरे यांनी केले. मंगेश पाटणकर यांनी आभार मानले. यावेळी हर्षद ब्राह्मणकर, व्हिनस वाणी, मिलिंद राजपूत, अनिल बाविस्कर, सुरेश माळी, ज्ञानेश्वर गोपाळे, संजीव नारंग, मंगेश काठे आदिंसह उद्योजक उपस्थित होते.
पायाभूत सुविधांवरील खर्च स्वागतार्ह : चंद्रशेखर चितळे
By admin | Updated: March 6, 2015 00:47 IST