शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकपदावर गंडांतर; हेमंत शेट्टींची धावपळ मनपा : उद्याच्या महासभेत हजेरी आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 01:02 IST

नाशिक : गुन्हेगाराच्या खुनात सहभाग असल्याच्या आरोपावरून मध्यवर्ती कारागृहात असलेले पंचवटीतील प्रभाग ४ मधील भाजपाचे नगरसेवक हेमंत शेट्टी हे गेल्या पाच महिन्यांपासून महापालिकेच्या महासभांना गैरहजर असून, येत्या सोमवारी (दि.२०) होणाºया महासभेला अनुपस्थित राहिल्यास त्यांचे पद धोक्यात येणार आहे. दरम्यान, शेट्टी यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचे सांगितले जात असून, न्यायालयाचा आदेश अद्याप प्राप्त न झाल्याने शेट्टी यांच्या सुटकेबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

ठळक मुद्दे नगरसेवकपदावर गंडांतर; हेमंत शेट्टींची धावपळ मनपा : उद्याच्या महासभेत हजेरी आवश्यक

नाशिक : गुन्हेगाराच्या खुनात सहभाग असल्याच्या आरोपावरून मध्यवर्ती कारागृहात असलेले पंचवटीतील प्रभाग ४ मधील भाजपाचे नगरसेवक हेमंत शेट्टी हे गेल्या पाच महिन्यांपासून महापालिकेच्या महासभांना गैरहजर असून, येत्या सोमवारी (दि.२०) होणाºया महासभेला अनुपस्थित राहिल्यास त्यांचे पद धोक्यात येणार आहे. दरम्यान, शेट्टी यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचे सांगितले जात असून, न्यायालयाचा आदेश अद्याप प्राप्त न झाल्याने शेट्टी यांच्या सुटकेबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.दि. २६ मे २०१७ रोजी पंचवटीतील श्रीपाद सूर्यवंशी खुनातील संशयित जालिंदर ऊर्फ ज्वाल्या अंबादास उगलमुगले याच्या खुनात सहभाग असल्याच्या आरोपावरून पोलिसांनी नगरसेवक हेमंत शेट्टी यांच्यासह सहा संशयितांना अटक केली होती. तत्पूर्वी, दि. १८ मे २०१७ रोजी झालेल्या महापालिकेच्या महासभेला हेमंत शेट्टी यांनी हजेरी लावली होती. दरम्यान, हेमंत शेट्टी यांची रवानगी नंतर नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात झाली. तेव्हापासून शेट्टी कारागृहातच आहेत. महाराष्टÑ प्रांतिक महापालिका अधिनियमानुसार, सलग तीन महिन्यांच्या सभांना गैरहजर राहिल्यास नगरसेवकपद रद्दबातल ठरविले जाते. त्यामुळे, शेट्टी यांनी पहिले दोन महिने रजेचा अर्ज दिल्याने सदस्यपदाला धोका राहिला नव्हता. परंतु, शेट्टींचा कारागृहातील मुक्काम वाढत गेला. अधिनियमानुसार, लागोपाठ सहा महिन्यांच्या सभांना गैरहजर राहिल्यास महापालिकेने मान्य केलेले असो वा नसो, नगरसेवकपद आपोआप रद्द होण्याची तरतूद आहे. हेमंत शेट्टी हे आतापर्यंत जून ते आॅक्टोबर या पाच महिन्यांत झालेल्या महासभांना गैरहजर राहिलेले आहेत आणि येत्या सोमवारी (दि.२०) होणाºया महासभेला गैरहजर राहिल्यास त्यांचे नगरसेवकपद धोक्यात येऊ शकते. दरम्यान, शेट्टी यांना जामीन झाला असल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप न्यायालयाचा आदेश प्राप्त झाला नसल्याचीही चर्चा आहे. तरीही सोमवारी महासभेला हजर राहण्यासाठी कारागृहातून परवानगी मिळविण्याचे प्रयत्न शेट्टींकडून सुरू असल्याचे समजते. महासभेत चार प्रस्तावयेत्या सोमवारी होणाºया महासभेत हेमंत शेट्टी यांनी चार प्रस्ताव नगरसचिव विभागाकडे दि. २४ आॅक्टोबर रोजी सादर केलेले आहेत. शेट्टी यांनी सदर प्रस्ताव नगरसचिव विभागाला दिल्याचे पत्र महापालिकेकडून पंचवटीतीलच भाजपाच्या एका नगरसेवकाने घेऊन ते कारागृहाच्या अधीक्षकांपर्यंत नेऊन पोहोचविण्याचे काम केल्याचे समजते. त्यामुळे सोमवारी शेट्टी हजर होण्याची शक्यता आहे.