शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

चूक दुरुस्त करण्याची, ना रिफंडची तरतूद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:13 IST

जीएसटी भरताना एखाद्या चलनात चुकून काही माहिती भरली गेलीच तर ती दुरुस्त करण्याची सोय नाही किंवा अशाच प्रकारे एखादी रक्कम जीएसटीच्या तीन खात्यांपैकी चुकून भलत्याच आवृत्तीत भरली गेली तर रिफंडची तरतूद नाही. त्यात सुधारणा करावी अशी तक्रार करीत नाशिकच्या कर सल्लागार संघटनेच्या वतीने मुंबईत जीएसटी आयुक्तांनाच साकडे घालण्यात आले.

नाशिक : जीएसटी भरताना एखाद्या चलनात चुकून काही माहिती भरली गेलीच तर ती दुरुस्त करण्याची सोय नाही किंवा अशाच प्रकारे एखादी रक्कम जीएसटीच्या तीन खात्यांपैकी चुकून भलत्याच आवृत्तीत भरली गेली तर रिफंडची तरतूद नाही. त्यात सुधारणा करावी अशी तक्रार करीत नाशिकच्या कर सल्लागार संघटनेच्या वतीने मुंबईत जीएसटी आयुक्तांनाच साकडे घालण्यात आले.  १ जुलैपासून जीएसटी लागू झाल्यानंतर त्यात सातत्याने बदल होत आहेत. अगोदरच जीएसटी भरण्याबाबतची संपूर्ण माहिती आणि रचनेचे आकलन होणे मुश्कील होत असताना नवनवीन समस्या रोजच उभ्या राहत आहेत. या संपूर्ण आॅनलाइन प्रक्रियेत मानवी चूक गृहीतच धरलेली नाही. एखाद्या चलनावरील माहिती भरताना चूक झाली आणि चुकीची माहिती भरली गेली तर ती अपलोड झाल्यानंतर मागे घेण्याची सोय नाही. उलट चुकीच्या माहितीवर आधारित पुढील विवरण दाखल करावी लागतात. मूल्यवर्धित कर लागू असताना त्यात ४८ तासांत चलन परत घेण्याची तरतूद होती, परंतु जीएसटीमध्ये अशी तरतूदच नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. यासंदर्भात नाशिक कर सल्लागार संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश गिरासे आणि माजी अध्यक्ष सतीश बूब यांनी सोमवारी (दि.२३) मुंबईत जीएसटी आयुक्त राजीव जलोटा यांची भेट घेतली आणि निवेदन दिले. केवळ चुकीचे चलनच नव्हे परंतु एखादा कर, दंडाची रक्कम किंवा विलंब शुल्काची रक्कम स्टेट जीएसटी, सेंट्रल जीएसटी किंवा आयजीएसटीत भरली गेली तर तिचा परतावा मिळण्याची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे एखाद्याने दंडाची एक हजार असो अथवा पाच हजार रुपये चुकून भलत्याच खात्यात टाकले तर ते परत मिळत नाही उलट पुन्हा दंड भरल्यानंतरच पुढील विवरण अपलोड होते. एखादा कर जादा भरला गेला आणि ती रक्कम दंडापोटी किंवा पुढील करापोटी भरायचे ठरविले तर त्याबाबतही समायोजनाची कोणीतही तरतूद नसल्याने भुर्दंड सोसावा लागतो. एखादा कर भरण्यासाठी करसल्लागाराने व्यापाºयाचे खाते लॉगइन केल्यानंतर ओटीपी टाकावा लागतो. तो व्यापाºयाच्या मोबाइलवर जातो. व्यापाºयाला दूरध्वनी करून तो ओटीपी घेताना व्यापाºयाच्या व्यस्ततेने वेळेत ओटीपी टाकला नाही तर पुन्हा सर्व प्रक्रिया सुरू करावी लागते. अशा अनेक तक्रारी असून, त्या जीएसटी कॉन्सिलमध्ये मांडण्याचे आश्वासन आयुक्त जलोटा यांनी दिले.दंडाची रक्कम चाळीस हजार रुपयांपर्यंतजीएसटीच्या दंडाच्या रकमेबाबत फार कमी व्यापाºयांना पुरेशी माहिती आहे. वेगवेगळ्या कराखाली दोन प्रकारचे विलंब शुल्क घेतले जाते. म्हणजेच स्टेट जीएसटीसाठी शंभर आणि सीजीएसटीसाठी शंभर असे दोनशे रुपये प्रतिदिन दंड आहे. हा प्रत्येक वेगवेगळ्या विवरणासाठी वेगळा आहे. त्या सर्वांचा हिशेब काढला तर वेळेत विवरण भरला नाही या एका सबबीखाली व्यापाºयांना चाळीस हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.