शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पाणी मीटर बसविण्यास नगरसेवकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 01:26 IST

बकेश्वर नगरपालिका हद्दीत नागरिकांच्या नळाला पाण्याचे मीटर बसविण्यास नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा विरोध असतानाही मुख्याधिकाºयांकडून पाणी मीटरचा आग्रह धरला जात असल्याबाबत नगरसेवकांनी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारत्र्यंबकेश्वर मुख्याधिकाºयांवर लाभाचा संशय

नाशिक : त्र्यंबकेश्वर नगरपालिका हद्दीत नागरिकांच्या नळाला पाण्याचे मीटर बसविण्यास नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा विरोध असतानाही मुख्याधिकाºयांकडून पाणी मीटरचा आग्रह धरला जात असल्याबाबत नगरसेवकांनी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली आहे. नगरपालिकेने ठराव करून पाणी मीटरला विरोध केलेला असतानाही मुख्याधिकाºयांनी त्यासाठी निविदा काढल्यामुळे यात त्यांचा वैयक्तिक लाभ असल्याचा संशयही व्यक्त केला आहे.निवेदनात म्हटले आहे की, त्र्यंबकेश्वर शहरास अंबोली, अहिल्या व गौतमी बेझे अशा तीन जलाशयांमधून पाणीपुरवठा केला जात असला तरी, सर्व पाणीपुरवठा योजना तांत्रिकदृष्ट्या सदोष असल्यामुळे शहरवासीयांना प्रत्येक वर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.शहरातील नागरिकांना महागड्या दराने पिण्याचे पाणी परवडणारे नाही. नगरपालिकेस नगर विकास सप्ताहाच्या निमित्ताने अडीच कोटी रुपये मिळाले आहेत. या निधीतून नागरिक व भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित असताना मुख्याधिकाºयांकडून या अडीच कोटी रुपयांचा वापर महागडे पाणी मीटर खरेदी करण्यासाठी केला जात आहे. त्यासाठी त्यांनी जाहिरात देऊन निविदाही मागविल्या आहेत. पाणी मीटर बसविण्यास जिल्हाधिकाºयांची संमती असल्याचे दाखवून दिशाभूल केली जात असून, नगरपालिकेच्या संपत्तीचा आपल्या अट्टहासासाठी दुरुपयोग केला जात असल्याचे म्हटले आहे. नगरपालिकेने २५ ते ३० नागरिकांना २४ तास स्पेशल कनेक्शन दिले आहे. यापूर्वीही दीड हजार रुपयांप्रमाणे पाणी मीटर घेण्यास भाग पाडले होते. त्या मीटरचे काय झाले याची चौकशी करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.या निवेदनावर नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, स्वप्निल शेलार, अनिता बागुल, विष्णू दोबाडे, शिल्पा रामायणे, शीतल उगले, कैलास चोथे, माधवी भुजंग, सायली शिखरे, संगीता भांगरे, भारती बदादे, सागर उजे आदींच्या स्वाक्षºया आहेत.ठरावाद्वारे विरोधपाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नगरपालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ नाही ही वस्तुस्थिती असताना मुख्याधिकाºयांनी मीटरने पाणीपुरवठा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नगरपालिकेच्या ३ आॅगस्टच्या सर्वसाधारण सभेत सर्व नगरसेवकांनी ठरावाद्वारे त्यास विरोध केला आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर