सातपूर : महापालिकेच्या सातपूर आरोग्य विभागाच्या वतीने गेल्या आठ दिवसांत जप्त करण्यात आलेला नायलॉन मांजा सर्वपक्षीय नगरसेवकांनी पुढाकार घेत नष्ट केली.पतंगासाठी लागणारा नायलॉन मांजामुळे होणारे दुष्परिणाम म्हणून बंदी घालण्यात येऊन जनजागृती करण्यात आली होती. आठवडाभरात जप्त करण्यात आलेला मांजा आज मकरसंक्रांतीचे औचित्य साधून नष्ट करण्यात आला. याप्रसंगी प्रभाग सभापती सुरेखा नागरे, नगरसेवक प्रकाश लोंढे सलीम शेख, सविता काळे, उषा शेळके, डॉ. सुनील बुधाने, विभागीय अधिकारी महेंद्र पगारे, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे, गोकुळ नागरे तसेच नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी ब्लेड आणि चाकूचा सहाय्याने या नायलॉन मांजाचे तुकडे करून मांजा नष्ट करण्यात आला.(वार्ताहर)
नगरसेवकांनी नष्ट केला मांजा
By admin | Updated: January 17, 2015 00:02 IST