नाशिक : शहर बस वाहतूक महापालिकेच्या गळ्यात मारणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस सेवा सुरू होत नाही तोच त्र्यंबकेश्वर आणि कसारा मार्गावर आपली मक्तेदारी सोडण्यास नकार देत आक्षेप घेण्याची तयारी कली आहे. मात्र, अशा प्रकारची सेवा लगेचच सुरू होणार नाही. ती करायचीच असेल तरी शासनाची परवानगी घेऊन करण्यात येईल, असे आयुक्त कैलास जाधव यांनी स्पष्ट केले.
नाशिक महानगर परिवहन महामंडळाची सिटी लिंक असलेली बस सेवा येत्या १ जुलैपासून सुरू करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. २७ तारखेपासून या बसची चाचणी सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील प्रमुख नऊ मार्गांवर ५० डिझेल बस धावणार आहेत. प्रत्यक्ष बस सेवा सुरू करण्याची वेळ जवळ आल्याने
मनपाची शहर बस सेवा सुरू करण्यास केवळ पंधरवडा राहिल्याने महापालिकेने प्रलंबित कामे मार्गी लावण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. महापालिकेच्या नियोजनानुसार नाशिकरोड आणि तपोवन येथील बस स्थानक महत्त्वाचे आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी सपाटीकरण आणि मजबुतीकरण केले जात आहे. सुरूवातीला याठिकाणी कामे होऊ शकतील, अशा प्रकारचे काम घाईघाईने पूर्ण करण्यात येत असून, त्यानंतर बसस्थानकाचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. कारण या दोन स्थानकात बस उभ्या राहणार असून, तपोवनात २५०, तर नाशिकराेड बसस्थानकात दीडशे बस उभ्या राहणार आहे. याठिकाणी या बसची तेथे त्यांची तांत्रिक तपासणी स्वच्छता आदी कामे केली जाणार आहे.
इन्फो...
९० टक्के तयारी पूर्ण
महापालिकेने बस सेवेची तयारी ९० टक्के पूर्ण केल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. सर्वच बस एकदम रस्त्यावर आणण्याऐवजी महापालिका सुरुवातीला केवळ पन्नास बस रस्त्यावर आणणार आहे. सुरूवातीला हायपेड मार्गावर बस धावणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने बसेसची संख्या वाढवण्यात येणार आहे.