शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

पालिकेला २५ कोटी एलबीटी५० कोटींवर

By admin | Updated: September 22, 2015 00:17 IST

उलाढाल : पाच महिन्यांत ३४२ कोटी जमा

नाशिक : महाराष्ट्र शासनाने ५० कोटी रुपयांच्या वर होणाऱ्या उलाढालीवर एलबीटी सुरूच ठेवल्याने नाशिक महापालिकेला आॅगस्ट महिन्यात एलबीटीच्या माध्यमातून सुमारे २५ कोटी रुपये प्राप्त झाले असून, एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत एकूण ३४२ कोटी रुपयांचा महसूल पालिकेच्या खजिन्यात जमा झाला आहे. दरम्यान, ५० कोटी रुपयांच्या आतील उलाढालीवर एलबीटी रद्द केलेला असल्याने शासनाकडून तीन महिन्यांचे १३७ कोटी ५८ लाख रुपये अनुदान यापूर्वीच पालिकेला प्राप्त झाले आहेत. शासनाने दि. १ आॅगस्ट २०१५ पासून ५० कोटी रुपयांच्या वर होणाऱ्या उलाढालीवर एलबीटी सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेला या उलाढालीतून किती उत्पन्न मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. त्यानुसार सुमारे ९० करपात्र व्यावसायिकांकडून महापालिकेला एलबीटीच्या माध्यमातून आॅगस्ट महिन्यात २५ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. महापालिकेने ५० कोटी रुपयांच्या वरील उलाढालीतून १५ ते १७ कोटी रुपये उत्पन्नच अपेक्षित धरले होते. परंतु त्यापेक्षा अधिक उत्पन्न प्राप्त झाल्याने महापालिकेला मोठा दिलासा लाभला आहे. आॅगस्ट २०१५ पासून राज्य शासनाने ५० कोटी रुपयांच्या आतील उलाढालीवरील एलबीटी रद्द केला. त्यापूर्वी एप्रिल ते जुलै २०१५ या चार महिन्यांत महापालिकेने एलबीटी वसुली केली, तर आॅगस्ट महिन्यात ५० कोटी रुपयांच्या वरील उलाढालीवर एलबीटी वसुली केली. त्यामुळे पाच महिन्यात निव्वळ एलबीटीपोटी महापालिकेच्या खजिन्यात ३४२ कोटी रुपये जमा झाले आहेत. शहरात अनेक कंपन्यांची ५० कोटी रुपयांची उलाढाल ही वेगवेगळ्या शहरात असलेल्या प्रकल्पांतून झाल्याचे दाखविण्यात आले असले तरी महापालिकेने नाशिक महापालिका हद्दीत झालेल्या उलाढालीवरील कर वसूल केल्याने महापालिकेला २५ कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न मिळविणे शक्य झाले आहे. मात्र, शासनाने याबाबतही संबंधित कंपन्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतल्यास या उत्पन्नात कपात होण्याची भीतीही पालिकेला आहे. (प्रतिनिधी)