शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

निफाड तालुक्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 00:18 IST

ओझर : जिल्ह्यासह राज्यात कोरोना रुग्णांचे दररोज वाढणारे आकडे धडकी भरणारे आहेत. त्यातच मृत्यूचे तांडव सुरू आहे. हे वास्तव असले तरी अन्य आजार व घाबरणे हेसुद्धा कोरोनात मृत्यूचे आणखी एक कारण असल्याचे समोर येत आहे. निफाड तालुक्यातील बरे होण्याचे प्रमाण जास्त असून, मृत्यूचे प्रमाण ३.१७ टक्क्याच्या जवळपास आहे. घटत्या रुग्णसंख्येने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देदिलासा : मृत्युदर मात्र ३.१७ टक्के

ओझर : जिल्ह्यासह राज्यात कोरोना रुग्णांचे दररोज वाढणारे आकडे धडकी भरणारे आहेत. त्यातच मृत्यूचे तांडव सुरू आहे. हे वास्तव असले तरी अन्य आजार व घाबरणे हेसुद्धा कोरोनात मृत्यूचे आणखी एक कारण असल्याचे समोर येत आहे. निफाड तालुक्यातील बरे होण्याचे प्रमाण जास्त असून, मृत्यूचे प्रमाण ३.१७ टक्क्याच्या जवळपास आहे. घटत्या रुग्णसंख्येने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे संकट कायम आहे. मध्यंतरी रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात शासन व प्रशासनाला यश मिळाले. सध्या कोरोना अधिक वेगाने पसरत आहे. दररोज कोरोना रुग्णांचे व मृत्यूचे आकडे भयभीत करणारे आहेत. त्यामुळे मनामनात भीतीदायक वातावरण निर्माण होत आहे.कोरोनाचे संकट अगदी जवळ आले असले तरी सजगता व निर्बंधांचे पालन केल्यास हे संकट अनेकपटींनी कमी करता येऊ शकते. सध्याच्या लाटेत कोरोना झालेले ८७.२ टक्के रुग्ण ठणठणीत होत आहेत.७ मे २०२१ पर्यंत तालुक्यातील १६ हजार २३२ नागरिकांना कोरोना झाला. त्यापैकी १४ हजार १५४ नागरिक कोरोनाला हरवून आले आहे. १ हजार ५६४ जणांवर उपचार सुरू आहेत. एकूण ५१४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारीनुसार बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे.पहिल्या लाटेच्या तुलनेत या लाटेत संकटाची व्याप्ती वाढली आहे. नागरिकांनी अजूनही सजगता व निर्बंधांचे काटेकोर पालन केल्यास कोरोनाच्या या लाटेवरही मात होऊ शकते. वेळीच तपासणी व योग्य उपचार मिळाल्यास ज्येष्ठांनी कोरोनावर मात केल्याचे अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाची चिंता करण्याऐवजी स्वतः व परिवाराची काळजी घेण्याची गरज आहे.नागरिकांनी मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे व हात स्वच्छ धुणे या त्रिसूंत्रीचे पालन करावे. लक्षणे दिसल्यास तातडीने तपासणी करावी. पात्र, नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. निफाड तालुक्यातील ८७.२ टक्के नागरिकांनी कोविडवर यशस्वी मात केली आहे. नागरिकांनी शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधांचे काटेकोर पालन करावे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी.- डॉ. अर्चना पठारे, उपविभागीय अधिकारी, निफाड.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याgram panchayatग्राम पंचायत