शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

बैलपोळ्यावर पुन्हा कोरोनाचे सावट ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:29 IST

मानोरी : काही दिवसांवर येऊन ठेवलेल्या बैलपोळा सणासाठी मातीचे बैल तयार करण्याचे काम कुंभार व्यावसायिकांकडून अंतिम टप्प्यात आले आहे. ...

मानोरी : काही दिवसांवर येऊन ठेवलेल्या बैलपोळा सणासाठी मातीचे बैल तयार करण्याचे काम कुंभार व्यावसायिकांकडून अंतिम टप्प्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून बैलपोळा सणावर कोरोनाचे कोरोनाचे सावट असल्याने दरवर्षीच्या तुलनेत तसेच गतवर्षीच्या तुलनेतदेखील यंदा मातीपासून तयार केल्या जाणाऱ्या बैलजोड्यांची संख्या कमी प्रमाणात तयार करण्यात येणार असल्याची माहिती कुंभार व्यावसायिकांकडून देण्यात आली आहे.

मागील काही वर्षांच्या तुलनेत ग्रामीण भागात बोटावर मोजण्याइतक्यातच शेतकऱ्यांच्या दावणीला बैलजोडी बांधलेली असल्याचे दुर्मिळ वास्तव आढळून आले असून अनेक शेतकऱ्यांनी हौस म्हणूनदेखील आपल्या घरी दावणीला बैलजोडी बांधून ठेवली असल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगण्यात येत आहे. वर्षभर शेतात राबराब काम करून बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळ्याला बैलांचे महत्त्व प्राप्त झाले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे बैलजोडी नाही असे शेतकरी मातीपासून तयार करण्यात आलेल्या बैलजोडीला मान देत असतात.

दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून कुंभार व्यावसायिकांना मातीपासून बनविलेल्या बैलजोडीला बाजारात मागणी कमी झाल्याने आर्थिक नुकसान होत असल्याची खंत कुंभार व्यावसायिकांनी बोलून दाखवली आहे.

मातीच्या बैलजोडीस बाजारात मोठी मागणी राहील, या आशेने तयार केलेल्या बैलजोडीस कोरोनामुळे मागणी घटल्याने तयार केलेला हजारो रुपयांचा माल तसाच पडून असल्याने यंदा कमी प्रमाणात मातीचे बैलजोडी तयार करण्यात आले असल्याचे शरद गोरे यांनी सांगितले.

चौकट...

शासनाने अर्थसाहाय्य देण्याची मागणी

मातीपासून नवनवीन वस्तू तयार करून त्यांची विक्री करून अनेक कुंभार व्यावसायिक आपली दैनंदिन गुजराण करत असतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने सर्व व्यवसाय ठप्प झाले होते. कुंभार व्यावसायिक नवरात्र, गणेशोत्सव, बैलपोळा सणासाठी मातीपासून मूर्ती तयार करणे, देवीच्या मूर्ती तयार करणे, बैलजोडी तयार करून आपला उदरनिर्वाह करत असतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या सणांवर निर्बंध घातल्याने मोठ्या प्रमाणात मूर्ती तसेच बैल मागणीअभावी पडून असल्याने आर्थिक फटका बसला असून शासनाने आर्थिक साहाय्य करून मदत देण्याची मागणी कुंभार व्यावसायिकांनी केली आहे.