शासनाने जमावबंदी, संचारबंदीसारख्या उपाययोजना जारी करतानाच शासकीय व खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांची संख्या घटवली, त्याच बरोबर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवण्यास भाग पडले. लग्न समारंभ, अंत्यविधीच्या उपस्थितीवर बंधने लादल्यामुळे गर्दीचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत झाली आहे. परिणामी, आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी होऊन रुग्णसंख्या घडल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होऊ लागले आहे. संचारबंदी जारी झाल्याच्या दिवशी जिल्ह्यात कोरोनाचे ३८५० रुग्ण होते. मात्र, पंधरा दिवसांत ही संख्या ३६,९०६ वर आली आहे.
----------
३१ मार्च ते १४ एप्रिल टेस्टिंग- २,४८,८६८
पॉझिटिव्ह- ३८,५८०
रुग्णालयातून सुटी- २,०७,४७२
कोरोनामुक्तीचा दर- २.०
जिल्ह्याचा पॉझिटिव्ह दर- २२.१
---------------------------
१५ एप्रिल ते १ मे टेस्टिंग- ३,३१,०२७
पॉझिटिव्ह- ३६,९०६
रुग्णालयातून सुटी- २,९०,५६३
कोरोनामुक्तीचा दर- १.२
जिल्ह्याचा पॉझिटिव्ह दर- -२.५
----------------
गर्दीवरील नियंत्रणाने झाले साध्य
१) कोरोनाचा प्रादुर्भाव संसर्गातून होत असल्याचे स्पष्ट झाल्याने शासनाने गर्दी होणाऱ्या ठिकाणांना प्रतिबंध तर केलाच; परंतु नागरिकांनाही गर्दी करण्यावर बंधने लादली.
२) संचारबंदी, जमावबंदीमुळे घोळक्याने फिरणारे, बसणाऱ्यांवर निर्बंध लादल्या गेल्याने संसर्गाचा धोका टळण्यास मदत झाली.
३) अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व आस्थापना बंद ठेवल्याने तसेच सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद, रिक्षा, टॅक्सीच्या वापरावरही मर्यादा घातल्याने प्रवास टळल्याने कोरोनाचा स्प्रेडर रोखण्यास हातभार लागला.
ग्रामीण भागात रुग्ण वाढण्यास अनेक कारणे
१) नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीसाठी अद्यापही बाजार समित्या सुरूच असून, दररोज या ठिकाणी अनेक गावांतून शेतकऱ्यांची ये-जा सुरू असल्याने कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव होत आहे.
२) लग्नसमारंभ, अंत्यविधी, दशक्रियासारख्या सार्वजनिक कार्यक्रमांमुळे शेकडो लोक एकत्र येत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढला.
३) ग्रामीण भागातील आठवडी बाजारातूनही कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. शिवाय मास्कच्या वापराबाबत जनजागृतीचा अभाव कारणीभूत आहे.