शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना आटोक्यात येईना, तरी बाजारात गर्दी मावेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:17 IST

किराणा मालाची दुकाने, पेट्रोल पंप, खाद्यपदार्थांची दुकाने, मेडिकल, बँका आदी ठिकाणी लोकांची झुंबड उडत आहे. बाजारपेठांना अक्षरशः जत्रेचे स्वरुप ...

किराणा मालाची दुकाने, पेट्रोल पंप, खाद्यपदार्थांची दुकाने, मेडिकल, बँका आदी ठिकाणी लोकांची झुंबड उडत आहे. बाजारपेठांना अक्षरशः जत्रेचे स्वरुप येत आहे. अनेकांच्या तोंडाला मास्क नाही, सोशल डिस्टन्सिंग नाही. सॅनिटायझरचा वापर होताना दिसत नाही. नागरिक कोरोना आजाराचे गांभीर्य विसरल्यासारखे रस्त्यावर बेछूटपणे येत आहेत. खरेदीसाठी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. पोलीस प्रशासनाने याचे गांभीर्य ओळखून एकतर वेळ वाढवावी, अन्यथा घरपोच सेवा देण्याची व्यवस्था करावी असे तज्ज्ञांचे मत आहे.

जिल्ह्यातील शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात देखील कोरोना संसर्गाचा प्रकोप वाढला असून अक्षरशः कोरोनाचा विस्फोट होतांना दिसतोय. यामुळे कोरोनाची दुसरी लाट अटोक्यात येण्यासाठी शासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असून, ‘मिशन ब्रेक द चेन’च्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी संचारबंदीसह कडकडीतपणे बंद पाळण्यात येत आहे.

प्रशासनाला कोरोना साखळी तोडायची आहे, की तशीच कायम चालू ठेवायची आहे, हे सर्वसामान्य लोकांच्या लक्षात न येणारी गोष्ट आहे, अकरानंतर रस्त्यावर प्रचंड शांतता असते; परंतु आधी दोन-तीन तास झालेली गर्दी कोरोनाला टाळू शकत नाही. कोरोना वेळ सांगून समाजात फिरत नाही, हे प्रशासनाने लक्षात घेण्याची बाब आहे. एकीकडे दुसर्‍या लाटेत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याने प्रशासन पूर्णपणे गोंधळून गेले आहे. ग्रामीण भागातील नागरिक उन्हाळ्याची सुटी लागल्यासारखे निर्धास्तपणे वावरताना दिसत आहेत.

-----------

स्थानिक प्रशासनाने शहरातून व बाहेरगावातून आलेल्या लोकांची यादी तयार करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात लोकांना हटकल्यास वाद-विवाद होतानांचे चित्र सर्वत्र दिसत आहेत. शहरातून येणाऱ्या लोकांवर कसलेही बंधन नाही आणि तेच कोरोना वाढीस निमंत्रण देत आहे. कोरोना साखळी तोडायची झाल्यास नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. (२९ जळगाव निंबायती)

===Photopath===

290421\29nsk_10_29042021_13.jpg

===Caption===

२९ जळगाव निंबायती