शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना टेस्ट ‘निगेटिव्ह’; कांदा लिलाव ‘पॉझिटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:15 IST

सिन्नर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर करण्यात आलेल्या सर्व कोरोना रॅपिड टेस्ट ‘निगेटिव्ह’ आल्यानंतर बाजार समितीच्या मुख्य आवारातील ...

सिन्नर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर करण्यात आलेल्या सर्व कोरोना रॅपिड टेस्ट ‘निगेटिव्ह’ आल्यानंतर बाजार समितीच्या मुख्य आवारातील कांदा लिलावासह नायगाव उपबाजारातील कांदा लिलाव सुरळीत झाल्याचे चित्र बुधवारी दिसून आले. यामुळे नांदूरशिंगोटे व दोडी या कांदा लिलावासाठी प्रसिध्द असलेल्या दोन्ही उपबाजारातही लवकरच कांदा लिलाव सुरु करण्याचा निर्णय बाजार समितीचे सभापती लक्ष्मण शेळके, उपसभापती संजय खैरनार, सचिव विजय विखे यांच्यासह संचालक मंडळाने घेतला आहे.

बारा दिवसांच्या कडक लॉकडाऊननंतर सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात मंगळवारपासून कांदा व शेतमालाच्या लिलावास प्रारंभ झाला. कोरोना नियमांची अंमलबजावणी करीत व्यापारी, शेतकरी व कर्मचाऱ्यांना बाजार समितीच्या आवारात प्रवेश दिला जात होता. मंगळवारी १५० जणांची कोरोना रॅपिड टेस्ट करण्यात आली. तर बुधवारी ५० जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली. सर्वजण निगेटिव्ह आल्याने व्यवहार सुरळीत झाले. बुधवारी सिन्नरच्या मुख्य आवारात २१०० क्विंटल कांदा आवक झाली होती. कमाल भाव १६०० तर सरासरी भाव १४०० रुपये राहिला. नायगाव उपबाजारातही ५७ वाहनांतून ७१० क्विंटल कांद्याची आवक झाली. नायगाव येथे कमाल भाव १७५० तर किमान भाव १४५० राहिला.

इन्फो...

नांदूर व दोडी उपबाजार सुुरु होणार

सिन्नर व नायगाव उपबाजार सुरळीत झाल्यानंतर नांदूरशिंगोटे व दोडी उपबाजार सुुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सचिव विजय विखे यांनी दिली. नांदूरशिंगोटे उपबाजार शुक्रवार (दि. २८) रोजी तर दोडी उपबाजार बुधवार (दि. २ जून) रोजी सुरु होणार आहे. उपबाजारात प्रवेश करणाऱ्यांना रॅपिड टेस्ट बंधनकारक असणार आहे. निगेटिव्ह टेस्ट येणाऱ्यांना आत प्रवेश दिला जात होता. याशिवाय मास्क, सामाजिक अंतर पाळणे आणि कोरोना संबंधीचे नियम पाळणे बंधनकारक असल्याचे सचिव विजय विखे यांनी सांगितले.

फोटो - २६ सिन्नर मार्केट

सिन्नर बाजार समितीच्या प्रवेशद्वारात प्रवेश देण्यापूर्वी कोरोना टेस्ट करताना आरोग्य कर्मचारी.

===Photopath===

260521\26nsk_41_26052021_13.jpg

===Caption===

सिन्नर बाजार समितीच्या प्रवेशद्वारात प्रवेश देण्यापूर्वी कोरोना टेस्ट करताना आरोग्य कर्मचारी.