मुख्याध्यापक जी. ए. शेवाळे यांच्या नियोजनानुसार वडनेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक निकम यांच्या मार्गदर्शनाने आरटीपीसीआर कॅम्प घेण्यात आला. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी डॉ. दीपाली मोरे यांचा विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक शेवाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कॅम्पमध्ये आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली. ज्येष्ठ शिक्षक पी. जी. उशिरे, बी. आर. निकम, व्ही. व्ही. कांबळे, के. बी. पवार, यांच्या उपस्थितीत ही चाचणी घेण्यात आली. शासनाच्या कोविड-१९ संदर्भातील नियमांचे पालन करत शालेय आवारात ९४ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. कोविड-१९ ची खबरदारी तसेच विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांची आरोग्याबाबत काळजी घेत एकाही विद्यार्थ्याला कोरोनाची बाधा होणार नाही याची दक्षता घेण्यात आली. प्रयोगशाळा तंत्रज्ञ उमेश येवला, भूषण बुणगे यांनी स्वॅब नमुने घेतले. आठवी ते दहावीचे वर्गशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
खाकुर्डी सेवा विद्यालयात ९४ विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:18 IST