शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने मूर्तीकारांचा व्यवसाय मंदावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 01:10 IST

येवला : कोरोनाने सर्वच स्तरातील उद्योगधंदे बंद पाडले आहेत. अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवावरदेखील कोरोनाचे सावट असल्याने मूर्तीकारांचा व्यवसाय मंदावला आहे. अनेक मंडळांनी यंदा साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवल्यामुळे गणेशोत्सवाशी संबंधित सर्वच व्यावसायिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

ठळक मुद्देफटका : गणेशोत्सवाशी संबंधित व्यवसायिकांचे आर्थिक गणित बिघडले

योगेंद्र वाघ ।लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : कोरोनाने सर्वच स्तरातील उद्योगधंदे बंद पाडले आहेत. अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवावरदेखील कोरोनाचे सावट असल्याने मूर्तीकारांचा व्यवसाय मंदावला आहे. अनेक मंडळांनी यंदा साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवल्यामुळे गणेशोत्सवाशी संबंधित सर्वच व्यावसायिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.येवला शहरासह तालुक्यात कुंभार समाजासह इतरही अनेक मूर्तीकार गणेशमूर्ती घडवतात. शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी तर गणेशमूर्ती बनविण्याचे कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये साधारणत: गणेशोत्सवाच्या चार महिने आधीपासूनच मूर्ती बनविण्याची तयारी सुरू होते. त्यासाठी बाहेरून रंग, वाळू, माती आदी साहित्य आणले जाते.येवल्यातील गणेशमूर्तींना नाशिक, अहमदनगर, पुणे, मुंबई, सुरत, अहमदाबाद आदी जिल्ह्यांत मोठी मागणी आहे. यंदा मात्र कोरोनामुळे लागू असणाऱ्या लॉकडाऊन व संचारबंदीने गणेशमूर्ती साहित्य उपलब्धतेची मोठी अडचण निर्माण झाली.याबरोबरच बाहेरील राज्यातून मागणी नाही. परिणामी मूर्तीकारांचे वर्षाचे आर्थिक गणितच बिघडले आहे.नियमांमुळे उत्सवाच्या स्वरूपावरही मर्यादा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा अनेक सार्वजनिक मंडळांनी निर्णय घेतला आहे. यात शासनाच्या अटी-नियमांमुळे गणेशमूर्तीच्या उंचीवर व उत्सवाच्या स्वरूपावरही मर्यादा आल्या आहेत. याबरोबरच यंदा गणेशमूर्तींचे दरही वाढलेले आहेत. गणेशोत्सवाशी संबंधित टी-शर्ट, सजावट साहित्य आदींची विक्री करणाºया व्यावसायिकांवर परिणाम जाणवणार आहे.येवल्यातील गणेशमूर्तींना सुरत, अहमदाबाद, मुंबई, पुणे, नाशिक, नगर, औरंगाबाद आदी ठिकाणी मोठी मागणी असते. मात्र कोरोनामुळे गणेशमूर्तींना बाहेरील मागणी नाही. लॉकडाऊनमुळे मूर्ती घडवण्यासाठी लागणारे साहित्यही उपलब्ध न झाल्याने यंदा गणेशमूर्तींचे दर वाढलेले आहे.आम्हाला आर्थिक फटका सहन करावा लागतो.- संजय परदेशी,मूर्तीकार, येवला

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी