शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने बॅण्ड वाजवला, आता आम्हाला वाजवू द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 23:48 IST

पिंपळगाव बसवंत : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने बॅण्ड व्यावसायिक व त्याच्यावर पोट भरणाऱ्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली असून, कोरोनाने व्यावसायिकांचा बॅण्ड वाजवला आहे. आता कोरोनाचा धोका कमी झाल्याने बॅण्ड व्यावसायिकांना परवानगी देण्याची मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाशिक जिल्हा बॅण्ड/बँजो असोसिएशनच्या वतीने देण्यात आले आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना निवेदन : जिल्हा बॅण्ड असोसिएशनचे साकडे

पिंपळगाव बसवंत : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने बॅण्ड व्यावसायिक व त्याच्यावर पोट भरणाऱ्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली असून, कोरोनाने व्यावसायिकांचा बॅण्ड वाजवला आहे. आता कोरोनाचा धोका कमी झाल्याने बॅण्ड व्यावसायिकांना परवानगी देण्याची मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाशिक जिल्हा बॅण्ड/बँजो असोसिएशनच्या वतीने देण्यात आले आहे.कोरोनाने लग्नसमारंभावर मर्यादा आल्या. त्यातूनच त्यावर अवलंबून असणारे छोटे-मोठे व्यवसायही कोलमडले. बॅण्ड व्यावसायिकांच्या रोजगारावर गंडांतर आले. व्यवसाय कसा करावा, कामगारांना कसे पोसायचे या आर्थिक विवंचनेत बॅण्डवाले अडकले. आता कोरोनाचा धोका कमी होत असताना बरेच निर्बंध शिथिल केले जात आहेत. त्यात लग्नसमारंभ व शुभकार्यात बॅण्ड वाजवू देण्यास परवानगी द्यावी यासाठीचे निवेदन नाशिक जिल्हा बॅण्ड असोसिएशनच्या वतीने जिल्हा अध्यक्ष शेख मास्टर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ, निफाड तालुका अध्यक्ष सुखदेव मोटमल, दिंडोरी तालुका अध्यक्ष योगेश शिंदे, नाशिक तालुका अध्यक्ष संतोष मेंधळे, उपाध्यक्ष राजू बिवाल उपस्थित होते. याबाबत मार्ग काढण्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे सांगण्यात आले. (२३ पिंपळगाव २)

टॅग्स :Governmentसरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या