नाशिक : जिल्ह्यात कोरोनाने सलग सात दिवस दोन हजाराचा टप्पा ओलांडल्यानंतर आठव्या दिवशी तब्बल तीन हजारांचा आकडा ओलांडून तब्बल ३३३८ बाधित संख्येपर्यंत मजल मारली आहे. बुधवारी (दि. २४) दिवसभरात तब्बल १५ बळीदेखील गेल्याने यंत्रणादेखील संभ्रमित झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याच्या चर्चेवर जणू शिक्कामोर्तब झाले आहे. जिल्ह्यात बुधवारी तब्बल ३३३८ बाधित रुग्ण तर २२२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर नाशिक मनपा क्षेत्रात १०, ग्रामीणला ३, मालेगाव मनपा क्षेत्रात १ तर जिल्हा बाह्य १ असा एकूण १५ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या २२६२ वर पोहोचली आहे. गत आठवडाभरापासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने दोन ते अडीच हजारावर राहिल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेसमोरदेखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.गत बुधवारीच गाठला होता दोन हजारांचा आकडागत आठवड्यात बुधवारी प्रथमच कोरोनाबाधितांच्या आकड्याने दोन हजारांचा टप्पा ओलांडला होता. त्याआधीच्या आठवड्यात बाधितांचा आकडा हजार ते दीड हजार होता. तर त्यापूर्वीच्या आठवड्यात हा आकडा पाचशे ते सहाशेदरम्यान होता. अवघ्या दोन आठवड्यात कोरोनाने वाढीचा महाभयानक वेग गाठला आहे. गत बुधवारी २१४६ पर्यंत मजल गाठल्यानंतर गुरुवारी २४२१ पर्यंत बाधितांच्या आकड्याने मजल मारली होती. तर शुक्रवारी त्यापेक्षाही अधिक म्हणजे २५०८ बाधित, शनिवारी २३८३ बाधित, रविवारी २३६०, सोमवारी २७७९ तर मंगळवारी २६४४ रुग्ण बाधित आढळून आले होते. या वेगाने जिल्ह्याची वाटचाल अत्यंत भयप्रद दिशेने सुरु झाल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.नाशिक मनपा क्षेत्रात १८४९नाशिक महानगरपालिका क्षेत्रात बुधवारच्या एकाच दिवसभरात सर्वाधिक तब्बल १८४९ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. शहरात एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळणे महापालिका क्षेत्रासाठी भीतीदायक आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातही बुधवारपासून कोरोना प्रसाराचा वेग वाढत असल्याचे ११९१ ग्रामीण बाधित आकड्यातून दिसून येत आहे. त्यामुळे आता संपूर्ण जिल्हाच कोरोनाच्या संकटाने वेढल्याचे दिसून येत आहे.प्रलंबित अहवाल पुन्हा ५ हजारावरजिल्ह्यात संशयितांची तपासणी आणि नमुने गोळा होण्याच्या प्रमाणात मागील दोन आठवड्यात प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, नमुना तपासणीच्या संख्येत फारशी वाढ झालेली नाही. त्यामुळेच प्रलंबित अहवालाची संख्या सातत्याने वाढत असून शुक्रवारी ही प्रलंबित अहवाल संख्या पुन्हा पाच हजारांचा टप्पा ओलांडून ५१०४ पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे घडू नये ते संकट नाशिककरांनी ओढवून घेतल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.सप्टेंबरनंतर मार्चमध्येच इतके बळीकोरोना रुग्ण संख्या वाढीबरोबरच बळींची वाढती संख्या ही अधिक संकटात टाकणारी आहे. तब्बल १५ बळींचा आकडा यापूर्वी गत वर्षी सप्टेंबर महिन्यातच गेले होते. त्यामुळे हा टप्पा ओलांडणे हे जिल्ह्यासाठी भयसूचक घंटाच ठरली आहे.
कोरोना रुग्ण प्रथमच ३ हजारावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 01:01 IST
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाने सलग सात दिवस दोन हजाराचा टप्पा ओलांडल्यानंतर आठव्या दिवशी तब्बल तीन हजारांचा आकडा ओलांडून तब्बल ३३३८ बाधित संख्येपर्यंत मजल मारली आहे. बुधवारी (दि. २४) दिवसभरात तब्बल १५ बळीदेखील गेल्याने यंत्रणादेखील संभ्रमित झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याच्या चर्चेवर जणू शिक्कामोर्तब झाले आहे. जिल्ह्यात बुधवारी तब्बल ३३३८ बाधित रुग्ण तर २२२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोना रुग्ण प्रथमच ३ हजारावर !
ठळक मुद्देप्रलंबित अहवाल पुन्हा ५ हजारावर