शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे तमाशातील अप्सरांच्या माथी उपेक्षाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 00:38 IST

मनमाड : सध्या ग्रामीण भागात यात्रांचा हंगाम सुरू असून, या कालावधीत ग्रामस्थांच्या करमणुकीसाठी लोकनाट्य तमाशाचे आयोजन केले जाते, मात्र यावर्षी कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागात यात्राच भरल्या नाही. परिणामी सर्वत्र तमाशाचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे.

गिरीश जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कमनमाड : सध्या ग्रामीण भागात यात्रांचा हंगाम सुरू असून, या कालावधीत ग्रामस्थांच्या करमणुकीसाठी लोकनाट्य तमाशाचे आयोजन केले जाते, मात्र यावर्षी कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागात यात्राच भरल्या नाही. परिणामी सर्वत्र तमाशाचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे.तमाशातील लावणी नाट्यगृहात आली म्हणून तमासगिरांचे दिवस बदलले नाही. आजही हे कलावंत आभाळाच्या तंबूखाली संसार मांडून तमाशा ही कला जिवंत ठेवत आहे. लावणीचे कार्यक्रम नाट्यगृहात सुरू झाले, मात्र पारंपरिक तमाशा करणाऱ्यांच्या नशिबाच्या दुर्दैवाचे दशावतार काही संपले नाही. चैत्र महिन्यात गावागोवी यात्रा जत्रांचा हंगाम सुरूअसतो. अनेक ठिकाणी हे कलावंत आपली कला सादर करण्यासाठी गावोगावच्या सुपारीची वाट पाहतात. एप्रिल व मे अशा दोन महिन्यांत साधारण ४७ ते ४८ यात्रांच्या तिथी येतात. यावर्षी कोरोनामुळे अनेक गावांमधे यात्रा भरल्याच नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत खर्च वाढला असला तरी व्यवसाय नसल्याने अगदी अल्प मानधनाच्या सुपारीवर कलाकार कार्यक्रम करण्यास तयार असले तरी त्यांना काम मिळू शकले नाही. ग्रामीण भागातील यात्रा, जत्रा रद्द करण्यात आल्याने ज्यांनी अर्धपोटी राहून प्रसंगी उपाशी राहून ही कला जागविली त्यांच्या नशिबी घोर उपेक्षा आली आहे.---------------आमच्या सोपान कोळी लोकनाट्य तमाशा मंडळाचा शेवटचा कार्यक्रम १२ मार्चला सायगाव येथे झाला होता. त्यानंतर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे ग्रामीण भागातील यात्रा रद्द झाल्याने तमाशा कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या संकटामधे कलाकारांना मदत करण्यासाठी सेवाभावी संस्थांनी पुढाकार घ्यावा.- सोपान कोळी दोनगावकर,तमाशा कलावंत----------------कोरोनाच्या संकटामुळे तमाशाचे कार्यक्रम रद्द झाले आहे. वर्षभरातील सुगीचा काळ म्हणून ओळखल्या जाणाºया यात्रांच्या हंगामामध्येच तमाशा कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा कठीणप्रसंगी फडातील कलाकारांना धान्य व किराणा वाटप करण्यात आले. या संकटातून देश वाचविण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करणे अपेक्षित आहे- राणी पाटील पैठणकर, तमाशा कलावंत

टॅग्स :Nashikनाशिक