शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक ; बळींची संख्या १५ अहवाल येण्यापूर्वीच तिघांचा मृत्यू : मृतांत नाशकातील महिलेसह मालेगावचे दोघे; जिल्ह्यात ४७० बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 01:57 IST

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा धोका कायम आहे. आणखी तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा तब्बल १५वर पोहोचला आहे. अहवाल येण्यापूर्वीच दगावलेले तिघे मृत बाधित असल्याचे मंगळवारी आलेल्या अहवालात स्पष्ट झाले.

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा धोका कायम आहे. आणखी तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा तब्बल १५वर पोहोचला आहे. अहवाल येण्यापूर्वीच दगावलेले तिघे मृत बाधित असल्याचे मंगळवारी आलेल्या अहवालात स्पष्ट झाले. दरम्यान, रात्री उशिरा मालेगावचे आणखी ३७ जण पॉझिटिव्ह आढळल्याने एकट्या मालेगावची बाधितांची संख्या ३८४ वर पोहोचली. तर जिल्ह्याचा बाधितांचा आकडा ४७० पर्यंत गेला.मंगळवारी मालेगावसह नाशिक जिल्ह्यात बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यात मालेगाव येथील ५५, येवला येथील १७, देवळाली कॅम्प येथील ७ तर नाशिक शहरातील ४ जणांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या तब्बल ४७० वर पोहोचल्याने यंत्रणेची चिंता वाढली आहे.नाशकात २ मे रोजी शासकीय रुग्णालयात एका महिलेचा मृत्यू झाला होता. तिचा मृत्यूपूर्वी घेतलेल्या नमुन्याचा तपासणी अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आल्याने शहरातील हा कोरोनाचा पहिला बळी ठरला आहे. गेल्या आठवड्यात या महिलेची प्रसूती धोकादायक असल्याचे लक्षात आल्यानंतर तिला आडगाव रुग्णालयात तातडीने दाखल होण्यास २४ एप्रिल रोजी सांगण्यात आले होते; २ मे रोजी ही महिला शासकीय रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिचा मृत्यू झाला. त्यापूर्वी तिची चाचणी करण्यात आली होती. मालेगावी दोनजणांचा काही दिवसापूर्वीच कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यांचाही पॉझिटिव्ह अहवाल मंगळवारी प्राप्त झाला.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या