शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णसंख्या; जिल्हा शंभरीपार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 02:37 IST

नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा मालेगावच्या भयावह वेगाने घडणाऱ्या पॉझिटिव्ह केसेसमुळे थेट ११० वर पोहोचला आहे. मंगळवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये मालेगावच्या ११ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मालेगावची बाधितसंख्या थेट ९६ वर पोहोचली आहे. त्याआधी दिवसभरात जिल्हा रुग्णालयातील १९ रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून, ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

ठळक मुद्देमालेगावमध्ये ११ पॉझिटिव्ह : जिल्ह्यात ११० बाधित

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा मालेगावच्या भयावह वेगाने घडणाऱ्या पॉझिटिव्ह केसेसमुळे थेट ११० वर पोहोचला आहे. मंगळवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये मालेगावच्या ११ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मालेगावची बाधितसंख्या थेट ९६ वर पोहोचली आहे. त्याआधी दिवसभरात जिल्हा रुग्णालयातील १९ रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून, ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांमध्ये मालेगावची रुग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण भयावह असून, त्या संख्येला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयास केले जात आहेत. तरीदेखील मालेगावमध्ये अक्षरश: दिवसामागून कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. मालेगावमध्ये केवळ आठ क्षेत्रात कोरोनाबाधित रु ग्ण आढळून आले होते.हा परिसर पूर्णपणे सील केला असतानाही आता या क्षेत्राबाहेर रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्राची संख्या आता १८ वर पोहोचली आहे. त्यामध्ये शहरातील संगमेश्वर, मोतीबाग नाका, संजय गांधीनगर, जाधवनगर, मोमीनपुरा, दातारनगर, जुने आझादनगर, जुना इस्लामपुरा, भायखळा झोपडपट्टी या भागाचा समावेश आहे.त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेसोबतच आरोग्य यंत्रणेची दमछाक होत आहे. तरीदेखील कोरोना कमी होण्याचेनाव घेत नसल्याने आरोग्य यंत्रणादेखील पुरती जेरीस आली आहे. दरम्यान, नाशिकचे एकूण १९ अहवालनिगेटिव्ह आल्याने नाशिकच्याआरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे.रुग्णसंख्या ९६ वरमालेगाव शहरातील कोरोनाबाधित रु ग्णांची संख्या ९६ वर पोहोचली असतानाच मृतांचा आकडादेखील वाढू लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत एकूण ८ रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी एका कोरोना संशयिताचा मृत्यू झाला. मात्र, त्याचा अहवाल मिळणे अद्याप बाकी आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल