शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

अडीच लाख रुग्णांनी हरवले कोरोनाला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:13 IST

नाशिक : जिल्ह्यातील कोरोनावाढीचा वेग प्रचंड असला तरी कोरोनामुक्त होण्याच्या दरातदेखील जिल्ह्यात अनुकूल वाढ होऊ लागली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ...

नाशिक : जिल्ह्यातील कोरोनावाढीचा वेग प्रचंड असला तरी कोरोनामुक्त होण्याच्या दरातदेखील जिल्ह्यात अनुकूल वाढ होऊ लागली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण अडीच लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच जिल्ह्यातील रुग्ण कोरोनामुक्त होण्याच्या दरात अल्पशी वाढ होऊ लागली असून, हीच त्यातल्या त्यात समाधानकारक बाब आहे.

कोरोना सर्वाधिक थैमान घालत असलेल्या जिल्ह्यांमध्ये नाशिकचा समावेश आहे. मात्र, अशा परिस्थितीतही कोरोनातून बरे होणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यात शंभर बाधितांपैकी किमान ८३ बाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपापल्या घरी परतत आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण अधिकाधिक वाढवण्यावर भर देण्याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाख ---- हजार ---- कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्य:स्थितीत ४७ हजार ७०४ रुग्णांवर उपचार सुरू असून, आत्तापर्यंत तीन हजार २७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

इन्फो

जिल्ह्यात सर्वाधिक उपचारार्थी नाशिक शहरात

नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक एक हजार ६२९, चांदवड एक हजार ७७५, सिन्नर एक हजार ८२२, दिंडोरी एक हजार ६०६, निफाड तीन हजार ५१३, देवळा एक हजार ११०, नांदगाव ९२४, येवला ७०४, त्र्यंबकेश्वर ४५०, सुरगाणा ३८२, पेठ १९७, कळवण ८४७, बागलाण एक हजार ६९२, इगतपुरी ३७३, मालेगाव ग्रामीण ७३६ असे एकूण १७ हजार ७६० पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २८ हजार १२, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात एक हजार ७१८, तर जिल्ह्याबाहेरील २१४ असे एकूण ४७ हजार ७०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तसेच आजपर्यंत जिल्ह्यात तीन लाखावर रुग्ण आढळून आले आहेत.

इन्फो

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढतेय

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये ८१.४५ टक्के, नाशिक शहरात ८३.५९ टक्के, मालेगावमध्ये ८२.२६ टक्के, तर जिल्हाबाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.२५ टक्के आहे तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८२.९१ इतके आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्क्यांपर्यंत घसरून आता थोडेसे वर जाऊ लागले असून, हीच त्यातल्या त्यात जमेची बाजू आहे. जिल्ह्यातील दोन लाख --- हजार ---- कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्य:स्थितीत ४७ हजार ७०४ रुग्णांवर उपचार सुरू असून, आत्तापर्यंत तीन हजार २७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

----------------------

ही डमी आहे.