शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

कोरोनाने तब्बल २२ तरुणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:13 IST

नाशिक : काेरोनाच्या पहिल्या लाटेत संसर्ग हा प्रामुख्याने घरांतील ज्येष्ठांसह मध्यमवयीन लोकांना अधिक व्हायचा. त्यावेळी बालकांना किंवा तरुणांना संसर्ग ...

नाशिक : काेरोनाच्या पहिल्या लाटेत संसर्ग हा प्रामुख्याने घरांतील ज्येष्ठांसह मध्यमवयीन लोकांना अधिक व्हायचा. त्यावेळी बालकांना किंवा तरुणांना संसर्ग झाल्याचे प्रकार अल्प आणि कोरोनाला बळी पडण्याचे प्रमाण अत्यल्प होते. मात्र, दुसऱ्या कोरोना लाटेत लहान मुलांना आणि युवकांना संसर्गाची लक्षणे आढळण्याच्या प्रमाणात मोठीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच बळी जाण्याच्या प्रमाणात १६ ते २५ वयोगटातील युवकांमध्ये मोठी वाढ झाली असून आतापर्यंत जिल्ह्यात २२ तरुणांचा बळी कोरोनाने घेतल्याने कोरोनाबाबत अधिकच काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

गतवर्षी डिसेंबरअखेरपर्यंत कोरोनाच्या पहिल्या लाटेत १२ वर्षाखालील लहान मुलांना ताप, घसादुखी, खोकला अशी सौम्य लक्षणे आढळली असली, तरी त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी सामान्य होती. त्यामुळे जिल्ह्यात ६ हजारांहून अधिक बालकांना कोरोना झाला तरी त्यातील बहुतांश बालकांना ॲडमिट करावे लागले नव्हते. त्यामुळे ज्यांच्या घरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, केवळ त्या घरांमधील बालकांमध्येच प्रामुख्याने आजाराचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले होते. त्यात अत्यल्प आणि अल्प उत्पन्न असणाऱ्यांचा मोठा समावेश होता. त्याशिवाय मुलांमध्ये सौम्य स्वरूपाची लक्षणे आढळण्याचा पॅटर्न दिसून आला होता. अनेक बालकांमध्ये बारीकसा ताप, थोडेसे गरगरणे, खोकला व घसादुखी अशी सौम्य लक्षणे होती. नव्या कोरोना व्हायरस संबंधात जे संशोधन नव्याने पुढे आले त्यात असे आढळले की तरुणांना याची लागण होण्याचे प्रमाण कमी असले तरी याआधीच्या तुलनेत हे प्रमाण अधिक असू शकते. गतवर्षी मोठ्या अर्थात १५ वर्षांपासून पुढील वयोगटातील मुलांमध्ये बाधितांची संख्या १६,६१२ इतकी होती. त्यात गत तीन महिन्यात तब्बल १० हजारांहून अधिक भर पडली असल्याचे दिसून येत आहे.

इन्फो

मुलांचे बाधितचे प्रमाण अधिक

आतापर्यंतच्या बाधित मुला-मुलींमध्ये मुले बाधित असण्याचे प्रमाण मुलींच्या तुलनेत दीडपटीपेक्षा थोडे कमी आहे. ० ते १२ वयोगटात ८८३० बालके बाधित आहेत. त्यात मुलांची संख्या ४९६४ तर ३८६६ बालिकांची संख्या आहे. तर १३ ते २५ वयोगटात वर्षापुढील मुला-मुलींच्या प्रमाणात १५,६३७ इतकी मुले तर १०,९८८ मुली बाधित असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे एकूणच बाधितांमध्ये बाहेर खेळण्याचे प्रमाण अधिक असलेल्या मुलांचीच संख्या अधिक असल्याचा निष्कर्ष काढता येतो.

जिल्ह्यात ० ते १२ वयोगटातील बालकांचे मृत्यू

०२

--------

१२ वर्षापुढील मुला-मुलींचे मृत्यू

२२

----------------

कोट

कोरोनाच्या प्रारंभीच्या टप्प्यातील काळात काही बालकांमध्ये गंभीर लक्षणे होती. त्यात एका अवघ्या २ महिन्याच्या बाळाचे तर ८० टक्के फुप्फुसे बाधित झाली होती. मात्र, कोरोनाच्या सर्व उपचारांसह त्याच्यावर प्लाझ्मा थेरपी केल्यानंतरच ते बाळ बरे झाले. तसेच आतादेखील बालकांमध्ये लक्षणे आढळण्याच्या प्रमाणात मोठीच वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.

डॉ. सुशील पारख, बालरोग तज्ज्ञ

-----------

कोट

गतवर्षी लहान मुलांमध्ये कोरोनाची अगदी सामान्य लक्षणे होती. मात्र, आता गत तीन महिन्यांपासून जुलाब हे देखील एक लक्षण दिसून येते. तसेच न उतरणारा ताप हेदेखील एक कोरोनाचे लक्षण आढळून आले. मात्र, बालकांमृत्यूचे प्रकार कमी असले तरी बाधित होण्याचे प्रमाण मात्र मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे.

डॉ. सुयश नाईक, बालरोग तज्ज्ञ