शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये कोरोनाच्या संसर्गाला राजकारणाचा डोस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:15 IST

नाशिक : शहरात पुन्हा कोरोना संसर्ग वाढू लागला आणि आता बेड‌्स तसेच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स मिळत नसल्याने रोष वाढू ...

नाशिक : शहरात पुन्हा कोरोना संसर्ग वाढू लागला आणि आता बेड‌्स तसेच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स मिळत नसल्याने रोष वाढू लागला आहे. महापालिकेच्या नुकत्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले आणि प्रशासनावर खापर फोडण्यात आले. मुळात लोकप्रतिनिधींची प्रशासनावर मांड नाही, असे यातून स्पष्ट होतेच; परंतु निर्बंध शिथिल झाल्यानंतर बाजारात अकारण गर्दी करणारे, राजकीय मेळावे या सर्व गोष्टींविषयी काय, लोकप्रतिनिधी तेथे वाईटपणा घेत नसल्याने लोकांना खूश करण्यासाठी प्रशासन सॉफ्ट टार्गेट ठरत आहे.

गेल्यावर्षी कोरोनाचे संकट आल्यानंतर आता ते जानेवारीत संसर्ग आटोक्यात आल्यासारखे दिसत होते. मात्र, नंतर फेब्रुवारीत पुन्हा संकट वाढले. मार्च महिन्यात तर कहर झाला आणि गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर महिन्यात आढळणारे बाधितांच्याा आकड्याचे उच्चांक यंदा मोडले जात आहेत. पुन्हा महापालिकेच्या रुग्णालयातील अव्यवस्था, खासगी रुग्णालयात बेड न मिळणे यांसह अन्य सारेच जैसे थे असल्याचे दिसू लागले आहे. कोरोनाचा उपसर्ग इतक्या मोठ्या प्रमाणात होत आहे की, आता नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. अशावेळी राजकीय लाभ उठवून प्रशासनाला धारेवर धरणे सोपेच आहे. त्यामुळे प्रशासनाला चार खडे बोल सुनावले की नागरिक खूश!

मुळात लोकानुनयाचे असे राजकारण करताना आपल्या प्रभागातील संसर्ग रोखण्यासाठी कोणी किती प्रयत्न केले हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक प्रभागात बाजारपेठा आहेत, तेथे हेाणारी गर्दी टाळण्यासाठी कोणत्या नगरसेवकाने प्रयत्न केले, फलक लावले की कटु बोल सुनावून वाईटपणा घेतला? राजकीय नेत्यांच्या भेटी आणि मेळावे कुठे कमी झाले? लोकप्रतिनिधींचा सहभाग केवळ प्रशासनाला धारेवर धरण्याइतपर्यंतच मर्यादित आहे काय याचेदेखील आत्मपरीक्षण होणे गरजेचे आहे.

जानेवारी महिन्यात थोडे रुग्ण कमी होत नाही ताेच महापालिकेचा निधी आरोग्यसेवा बळकट करण्यावर खर्च करण्यापेक्षा आपल्या प्रभागातील विशेषत: डांबराचे थर कसे वाढतील याकडे लक्ष पुरवले गेले. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे अपुरे मनुष्यबळ आहे. कंत्राटी कर्मचारी घेतले तरी नगरसेवकांच्या वशिल्यातील कर्मचाऱ्यांना काेरोना रुग्णालयात काम देऊ नका म्हणून दबाव का टाकला जातो? काेविड सेंटर्स सुरू केल्यानंतर तेथे बेड, टेबल-खुर्च्या आणि भोजन पुरविण्यापासून कंत्राटे कोणाकडे जातात याचा विचार केला तरी कुठे तरी राजकीय नेत्यांशी, नगरसेवकांशी संबंधित व्यक्तीच सापडतात. मग केवळ उणिवा काढून प्रशासनावर दोेषारोप करण्यापेक्षा स्वत: प्रशासनाला कितपत पाठबळ दिले आणि प्रसंगी जनतेशी कटुपणा किती घेतला याचाही विचार करायला हवा. तरच प्रशासनावर खापर फोडण्याचा नैतिक अधिकार संबंधिताना मिळू शकेल. मुळात कोरोना संसर्ग राेखण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नाही तर लाेकप्रतिनिधींचीदेखील आहे, हे लक्षात घेतले तरी खूप झाले!