शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा विस्फोट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : जिल्ह्यात कोरोनाने सलग दुसऱ्या दिवशी कहर केला असून, बाधित संख्येचा पुन्हा भयावह विस्फोट झाला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाने सलग दुसऱ्या दिवशी कहर केला असून, बाधित संख्येचा पुन्हा भयावह विस्फोट झाला आहे. गुरुवारी (दि. १८) दिवसभरात तब्बल २४२१ इतके बाधित रुग्ण आढळले असून, हा एकाच दिवसातील बाधितांचा सर्वात मोठा उच्चांक ठरला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कोराेनाची स्थिती गंभीर चिंतेच्याही पुढे पोहोचली असल्याने खूप मोठे संकट घोंगावू लागले आहे.

जिल्ह्यात गुरुवारी तब्बल २४२१ बाधित रुग्ण, तर ८८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात २ आणि ग्रामीणला २ असे एकूण ४ जणांचे बळी गेल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या २१९७वर पोहोचली आहे. गत वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात कोरोनाबाधितांची दररोजची संख्या साधारणपणे दीडशेच्या आसपास आली होती. त्यामुळे नूतन वर्षात नाशिक कोरोनामुक्त होण्याची आशा वाटू लागली होती. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत हे चित्र कायम होते. मात्र, दरम्यानच्या काळातील लग्नसोहळे आणि उत्सवी वातावरणामुळे तसेच जनतेत कोरोनाबाबत आलेल्या बेफिकिरीमुळे कोरोनाचे प्रमाण पुन्हा वाढू लागले. आठवडाभरापासून तर कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने हजार ते पंधराशेवर राहिल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा हतबल झाली होती. त्यात बुधवारी आणि गुरुवारी असे सलग दोन दिवस कोरोनाबाधितांचा आकडा दोन हजारांवर राहिल्याने सामान्य नागरिकांनीदेखील विशेष दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.

इन्फाे

नाशिक मनपा क्षेत्रात १२९६

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात बुधवारच्या एकाच दिवसभरात सर्वाधिक तब्बल १२९६ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. महानगरात एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात बाधित आढळल्याने नाशिक महापालिका क्षेत्रात कोरोनाची सर्वाधिक दहशत निर्माण झाली आहे.

इन्फो

सलग दोन हजारावर प्रथमच

गतवर्षी सर्वाधिक कोरोना रुग्ण ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात सापडले होते. मात्र, त्यावेळीदेखील सलग दोन दिवस बाधित संख्या दोन हजारांच्या आकड्याला ओलांडून गेली नव्हती. त्यावेळी सप्टेंबर महिन्यात एकदाच २०४८ इतके कोरोना रुग्ण बाधित आढळले होते. त्यानंतर बाधितांची संख्या सातत्याने खालीच आली होती.

इन्फो

रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्क्यांखाली

जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचा दर मागील महिन्यापर्यंत ९८ टक्क्यांवर पोहोचला होता. मात्र, मार्च महिन्याच्या प्रारंभापासून रुग्णवाढ अधिक आणि कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण कमी यामुळे रुग्ण कोरोनामुक्त होण्याचा दर काही प्रमाणात घसरू लागला. मात्र, गत आठवड्यापासून तर कोरोनामुक्त रुग्णांचा दर दिवसाला एक टक्क्याच्या आसपास दराने घसरू लागल्याने गुरुवारी हा दर ९० टक्क्यांखाली म्हणजे ८९.६५वर पाेहोचला आहे.