शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे नाशिक महापालिकेच्या बससेवेला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:20 IST

नाशिक : महत्प्रयासानंतर नाशिक महापालिकेच्या बससेवेसाठी राज्य शासनाकडून रखडलेला परवाना अखेर मिळाला असला तरी शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने ...

नाशिक : महत्प्रयासानंतर नाशिक महापालिकेच्या बससेवेसाठी राज्य शासनाकडून रखडलेला परवाना अखेर मिळाला असला तरी शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने तूर्तास महापालिकेनेच जरा ब्रेक घेण्याचे ठरवले आहे. सुरक्षित अंतराचा फज्जा उडणार असेल आणि शहरातील बाधितांची संख्या वाढणार असेल तर बस सुरू करून काय उपयेाग, असा प्रश्न भाजपने केला आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने नाशिक महानगर परिवहन महामंडळ बससेवा सुरू करण्यास तयार आहे. मात्र एकेक अडथळे येत आहेत. त्या दूर करून प्रजासत्ताकदिनी सेवा सुरू करण्याची तयारी करण्यात आली असताना बस परवानाच उपलब्ध नसल्याचे प्रकरण पुढे आले. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात राज्य शासनाच्या परिवहन मंत्रालयाकडे बस चालवण्यास परवाना मिळावा म्ह‌णून महापालिकेने अर्ज केला होता. मात्र, त्यानंतर वारंवार स्मरणपत्र देऊनही परवाना मिळाला नव्हता. दरम्यान, महापौर सतीश कुलकणी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या्कडे तर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर अखेरीस गेल्या १८ फेब्रुवारीस हा परवाना मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर परवान्यासह सर्व माहिती आणि विशेषत: तिकीट दर निश्चितीसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे अर्ज करण्यात येणार आहे. या प्रक्रियेला दहा ते पंधरा दिवस लागू शकतात. मात्र, त्यानंतरही शहरात मेाठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने अडचण झाली आहे.

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर नागरिकांकडून सुरक्षा नियमांचे पालन न झाल्याने कोराेना संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे आरोग्य नियमांचे पालन करण्यासाठी प्रशासनाला कारवाईचा बडगा उगारावा लागत आहे. अशा वेळी बससेवा सुरू करणे कठीण असून त्यातून संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरटीएची परवानगी मिळाली तरी अशा प्रकारे बससेवा सुरू करण्याची तयारी नसल्याचे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.

कोट..

महापालिकेच्या वतीने बससेवा सुरू करण्यासाठी तयारी करण्यात आली असली तरी कारोना संसर्गामुळे बसमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन कितपत होईल याविषयी शंका आहे. त्यामुळे योग्य तो विचार करून निर्णय घ्यावा लागेल.

- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका

===Photopath===

250221\25nsk_35_25022021_13.jpg

===Caption===

नाशिक महापालिकेच्या बस सेवा