शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने पारावरील गप्पांना ब्रेक, गावकऱ्यांचे संवादही फिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:13 IST

नांदूरशिंगोटे : सकाळी रस्त्यावर गर्दी करून गप्पा मारत उभी असलेली ग्रामीण भागातील माणसे कडक निर्बंधांच्या काळात दिसेनाशी झाल्याने आपापसातला ...

नांदूरशिंगोटे : सकाळी रस्त्यावर गर्दी करून गप्पा मारत उभी असलेली ग्रामीण भागातील माणसे कडक निर्बंधांच्या काळात दिसेनाशी झाल्याने आपापसातला जणू संवादच हरवल्याची स्थिती झाली असल्याचे सध्या दिसत आहे. एरव्ही सकाळी ७ वाजताच गावातून जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा घोळक्याने उभे असलेले गावकरी आता दिसत नाहीत.

रस्त्याच्या कडेला दांडीच्या पातेल्यात उकळी फुटलेल्या चहाच्या वाफा नाहीत, की त्याचा दरवळ नाही. कढईत उकळणाऱ्या तेलातल्या वड्यांचा व भज्यांचा सुर्र आवाजही नाही आणि गावात घडलेल्या घटनांची चर्चाही नाही. ‘चल या गोष्टीवर’ चहा पाजतो असे हातावर टाळी देऊन दणक्यात आवाज देणारा वर्ग रस्त्यावरून गायब झाला आहे. त्यामुळे चहा पाजणारे व त्यांच्याकडून चहा पिणारे कोणीच दिसत नाहीत. सकाळच्या गप्पाटप्पा व चहा, नाश्ता टपरीवर जाऊनच करायचा असा दिनक्रम असलेल्या मंडळींची संख्या ग्रामीण भागात मोठी असते. त्यामुळे सकाळी ७ वाजेपासूनच रस्ते गर्दीने जिवंत होतात. कोरोना काळातील निर्बंधामुळे गावाकडचे रस्ते जणू ‘मुके’ झाल्याचा अनुभव सध्या येत आहे. नेहमी गर्दीतून वाट काढताना हॉर्न वाजवताना दिसणाऱ्या दुचाकी गाड्या व चारचाकी वाहने आता रस्त्यावर चिटपाखरू नसल्याने भरधाव वेगाने जाताना दिसत आहेत.

-----------------------

गावामधील वर्दळ थंडावली

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे घरात बसून घुसमटत आहेत. संवादाने कट्टी घेतली आहे. केव्हा हा कोरोना संपतो आणि सगळे सुरळीत होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिक-पुणे रस्त्यावरचे नांदूरशिंगोटे, दोडी, माळवाडी, गोंदेफाटा, करहे फाटा असो की, नांदूरशिंगोटे मधून जाणारा लोणी, तळेगाव, कोल्हार रस्ता किंवा वावीमार्गे कोपरगाव, येवला रस्ता असो यांच्यासह ग्रामीण भागातील आणि या भागातील गावामधील वर्दळ सध्या तरी चिडीचूप झाली आहे.