शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना तपासणीसाठी गेलेल्या पथकावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:15 IST

नाशिक: जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी संशयित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची अँटिजेंन चाचणी करण्याचा धडक उपक्रम जिल्हा ...

नाशिक: जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी संशयित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची अँटिजेंन चाचणी करण्याचा धडक उपक्रम जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने हाती घेतलेला असला तरी तपासणीसाठी गावोगावी जात असलेल्या वैद्यकीय पथकाला काही ठिकाणी लोकांच्या रोषास सामोरे जावे लागल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. कळवण तालुक्यातील जयदर व तिरहाळे येथे वैद्यकीय पथकावर दगडफेक करून पिटाळून लावले तर तपासणीची सक्ती केल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राचा पाणी पुरवठा तोडण्याचा इशारा देण्यात आला. या प्रकाराने पथक भयभीत झाले असून, पोलिसांना याची खबर देण्यात आली आहे.

कळवण तालुक्यातील जयदर येथे कोरोना संशयित रुग्ण सापडल्यामुळे वैद्यकीय पथक सोमवारी गावात गेले. ज्याठिकाणी रुग्ण आढळून आला तेथे कॉंटोंमेंट झोन जाहीर करून, रुग्णाच्या सानिध्यात आलेल्या लोकांची अँटिजेंन चाचणी करण्याचा प्रयत्न सुरू करताच काही लोकांनी एकत्र येत पथकावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला, काही दगड घेऊन पथकाच्या पाठीमागे धावले, ज्या ठिकाणी कॉंटोंमेंट झोनचे फलक लावले ते देखील फाडून फेकण्यात आले. गावात पाय ठेवल्यास तुम्हाला झोडपून तुमच्याच आरोग्य केंद्रात दाखल करू अशी धमकी दिल्यामुळे वैद्यकीय पथक हवालदील झाले. या वेळी गावचे सरपंच व ग्रामसेवकाने समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही धमकी देण्यात आली. परिणामी पथक माघारी फिरले. या घटनेची खबर गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात येऊन पोलिसांना कळविण्यात आले.

अशाच प्रकार तालुक्यातील तिरहाळे येथे देखील घडला. वैद्यकीय पथक गावात तपासणीसाठी आल्याचे कळताच गावातील लोक एकत्र आले व त्यांनी पथकाला घेराव घालून तुम्ही मुद्दाम त्रास देण्यासाठी गावात आल्याचा आरोप करून, आम्हाला काहीच झालेले नसताना चुकीच्या पद्धतीने कोरोना पॉझीटीव्ह दाखवतात असे सांगून गावातून निघून जा, अन्यथा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वीज, पाणी पुरवठा तोडण्याचा इशारा दिल्याने वैद्यकीय पथक माघारी फिरले. या दोन्ही घटनांनी कोरोनाशी दोन हात करण्यास तयार असलेल्या वैद्यकीय पथक घाबरले असून, आरोग्य कर्मचारी एकटेदुकटे गावात जाण्यास नकार देत आहेत