शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना... अन् कोरोनाच..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 00:37 IST

नाशिक : गेल्या महिनाभरापासून सातत्याने नागरिकांच्या कानावर कोरोना हा एकच शब्द येत असून, त्याचा थेट परिणाम आता बहुतांश नागरिकांच्या मनावर होताना दिसून येत आहे त्यामुळे कोरोना मनोविकार बळावू लागला की काय? अशी शंकाही उपस्थित होत आहे. साधे घशामध्ये खवखवले आणि थोडीशी जरी सर्दी जाणवली तरीदेखील मनामध्ये कोरोना आजाराची शंका बहुतांश लोकांना येऊ लागली आहे.

नाशिक : गेल्या महिनाभरापासून सातत्याने नागरिकांच्या कानावर कोरोना हा एकच शब्द येत असून, त्याचा थेट परिणाम आता बहुतांश नागरिकांच्या मनावर होताना दिसून येत आहे त्यामुळे कोरोना मनोविकार बळावू लागला की काय? अशी शंकाही उपस्थित होत आहे. साधे घशामध्ये खवखवले आणि थोडीशी जरी सर्दी जाणवली तरीदेखील मनामध्ये कोरोना आजाराची शंका बहुतांश लोकांना येऊ लागली आहे.सातत्याने कोरोना हेच शब्द कानी येऊ लागल्याने आता अनेकांचे मनोधैर्य खचू लागले असून भीती वाढू लागली आहे. मात्र कोरोना आजारापासून स्वत:ला सुरक्षित नक्कीच ठेवता येते त्यासाठी स्वयंशिस्त पालन महत्त्वाचे ठरते. आपण हा आजार होऊ नये म्हणून काळजी घेत आहोत, या विचाराने स्वत:ला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी केले आहे.महिनाभरापूर्वी नाशिक शहर व जिल्ह्याची स्थिती पूर्णपणे वेगळी होती. केवळ कोरोना संशयित रुग्ण आढळून येत होते तेदेखील मोजकेच, मात्र आता स्थिती बदलली आहे. शहरासह जिल्ह्यात ही कोरोनाबाधित रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, मनपा प्रशासन, पोलीस प्रशासन या आजाराला नियंत्रणात नव्हे तर संपुष्टात आणण्यासाठी निकराची झुंज देत आहेत. कठीणसमयी प्रशासनाला साथ देणे गरजेचे आहे. कुठल्याही भीतीपोटी कोणतेही टोकाचे पाऊल उचलण्याची गरज नाही.कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आपल्या विचारात नकारात्मक भावना येऊ देऊ नये व कुठल्याही नैराश्याला बळी पडू नये, असे शहरातील मनोविकार तज्ज्ञांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक