शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल

By admin | Updated: April 23, 2017 02:28 IST

नाशिक : शेतात अनाधिकारे घुसून मोजणी केली अशा अधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचा निर्णय शेतकरी संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला

 नाशिक : समृद्धी महामार्गाच्या जागा मोजणीस विरोध दर्शविणाऱ्या शेतकऱ्यांवर चॅप्टर केसेस करण्याचा प्रकार म्हणजेच कायद्याचा दुरुपयोग असून, ज्या ज्या अधिकाऱ्यांनी जागा मालकांच्या शेतात अनाधिकारे घुसून मोजणी केली अशा अधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचा निर्णय शेतकरी संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हे दाखल करून न घेतल्यास न्यायालयात जाऊन दाद मागण्याचेही यावेळी ठरविण्यात आले आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी सिन्नर तालुक्यातील शिवडेसह पाच गावातील शेतकऱ्यांनी जागा मोजणीस विरोध दर्शविल्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून मोजणीचे काम ठप्प झाले असून, शासकीय अधिकाऱ्यांना थेट गावबंदीच करण्यात आल्यामुळे पोलीस प्रशासनाने जागा मालक शेतकऱ्यांना चॅप्टर केसेसच्या नोटिसा पाठविल्या आहेत. त्यावर विचार विमर्श करण्यासाठी तसेच येत्या २६ एप्रिल रोजी शहापूर येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याने त्याची तयारी म्हणून संघर्ष समितीची बैठक अ‍ॅड. दामोधर पागेरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते असल्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून पोलीस यंत्रणेने शेतकऱ्यांना गुन्हेगार ठरविण्यास सुरुवात केल्याचा आरोप करण्यात आला. सनदशीर मार्गाने जागा मालकांनी मोजणीस विरोध केला, कोणत्याही शासकीय मालमत्तेचे नुकसान केलेले नाही असे असताना त्यांच्यावर चॅप्टर केसेस करण्यात येत असल्याबद्दल शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. या बैठकीस कॉ. राजू देसले, अ‍ॅड. रतनकुमार इचम, भास्कर गुंजाळ, सोमनाथ वाघ, शांताराम ढोकणे, ज्ञानेश्वर चव्हाण, रावसाहेब हरक, किरण हरक, विष्णुपंत वाघचौरे, सुभाष सातपुते, जगन्नाथ घोडके, महादू तुपे, सुनील तुपे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)