शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घरफोड्यांच्या टोळीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 00:38 IST

नाशिक : आदिवासी आश्रमशाळेतील बलात्काराच्या गुन्ह्यात सात वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर टोळी तयार करून नाशिक, पेठ व दिंडोरी तालुक्यात घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार हरिदास बाळू निसाळ व त्याच्या चार साथीदारांना नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे़ या टोळीकडून घरफोडी व चोरीतील ८३ मोबाइल, इलेक्ट्रॉनिक साहित्य असा दोन लाख ७१ हजार ६९० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखा : ८३ मोबाइल फोन हस्तगतबलात्काराची शिक्षा भोगलेला म्होरक्या

नाशिक : आदिवासी आश्रमशाळेतील बलात्काराच्या गुन्ह्यात सात वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर टोळी तयार करून नाशिक, पेठ व दिंडोरी तालुक्यात घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार हरिदास बाळू निसाळ व त्याच्या चार साथीदारांना नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे़ या टोळीकडून घरफोडी व चोरीतील ८३ मोबाइल, इलेक्ट्रॉनिक साहित्य असा दोन लाख ७१ हजार ६९० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़नाशिक, पेठ व दिंडोरी तालुक्यातील घरफोडीचे गुन्हे वाढल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते़ या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी घरफोडीच्या उघडकीस न आलेल्या गुन्ह्णांचा आढावा घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांना चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार करपे यांनी माहिती घेतली असता काही संशयित दिंडोरी तालुक्यात राहत असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार दिंडोरी तालुक्यातील नाळेगाव शिवारात मंगळवारी (दि़ ३१) रात्री सापळा रचून संशयित हरिदास बाळू निसाळ (२७), गणेश बाळू निसाळ (१९), कार्तिक नाना भोये (२०), राजू सुदाम निसाळ (२०, सर्व राहणार नाळेगाव, ता. दिंडोरी) या चौघांना अटक केली तर श्रावण रामदास वाघमारे (२५) हा फरार आहे़या चौघा संशयितांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी पेठ, दिंडोरी, गिरणारे परिसरात घरफोड्या तसेच नाशिक शहरात दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे़ या संशयितांकडून विविध कंपन्यांचे ८३ मोबाइल फोन, मोबाइल अ‍ॅक्सेसरी, होम थिएटर, रेडिमेड कपडे, डीव्हीआर मशीन, चोरी केलेली पल्सर दुचाकी, गुन्ह्णात वापरलेली डिस्कव्हर दुचाकी तसेच गुन्हे करण्यासाठी वापरलेले स्क्रू ड्राइवर, पकड, लोखंडी कटवणी असा एकूण दोन लाख ७१ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़पोलीस निरीक्षक अशोक करपे, पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ मुंढे, रवींद्र शिलावट, पोलीस हवालदार प्रकाश तुपलोंढे, हनुमंत महाले, दीपक अहिरे, पुंडलिक राऊत, दत्तात्रय साबळे, गणेश वराडे, पोलीस नाईक वसंत खांडवी, अमोल घुगे, जालिंदर खराटे, महिला पोलीस नाईक योगिनी नाईक यांनी ही कामगिरी केलीग़ुन्ह्यांची उकल होण्याची शक्यताघरफोडी करणाऱ्या या टोळीचा म्होरक्या हरिदास बाळू निसाळ याच्यावर दिंडोरी तालुक्यातील एका आदिवासी आश्रमशाळेतील बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला होता़ या गुन्ह्णात न्यायालयाने दिलेली सात वर्षांची शिक्षा भोगून तो बाहेर आला आहे़ या आरोपींकडून घरफोडीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे़