सिडको : पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा आणि पालकांमध्ये समन्वय असण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मनपातील विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी केले. रायगड चौकातील मनपा शाळा क्रमांक ४ मध्ये आयोजित पालक मेळाव्याच्या ते बोलत होते. विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धांमधील यश, शाळेचे वातावरण, विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी वाय. एस. गायकवाड यांनी ‘सुजाण पालक’ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कुऱ्हे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष रत्ना पाटील, उपाध्यक्ष अनघा कुलकर्णी, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष रमेश वडनेरे, कार्याध्यक्ष बाबूराव निकम, शिक्षणतज्ज्ञ कापडणे आदि उपस्थित होते. प्रास्ताविक केंद्र समन्वयक विसपुते यांनी, तर सूत्रसंचालन अंजली तांबे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्रीमती नांदुर्डीकर व शाळेच्या शिक्षकांचे सहकार्य लाभले. (*वार्ताहर)