शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

सहकार समृद्ध होणे गरजेचे : सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 00:14 IST

अनुदानातून नव्हे, तर योगदानातून सहकार क्षेत्र वाढवायचे आहे. गेल्या वर्षी ८५० संस्थांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला. यावर्षी राज्यातील पाच हजार संस्थांचे बळकटीकरण करण्याचे उद्दिष्ट्य समोर ठेवण्यात आले आहे. राज्य समृद्ध करण्यासाठी सहकार क्षेत्र समृद्ध होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

सिन्नर : अनुदानातून नव्हे, तर योगदानातून सहकार क्षेत्र वाढवायचे आहे. गेल्या वर्षी ८५० संस्थांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला. यावर्षी राज्यातील पाच हजार संस्थांचे बळकटीकरण करण्याचे उद्दिष्ट्य समोर ठेवण्यात आले आहे. राज्य समृद्ध करण्यासाठी सहकार क्षेत्र समृद्ध होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.डुबेरे येथील श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवाच्या सांगतासमारंभानिमित्त जिल्हास्तरीय श्रीमंत भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देशमुख बोलत होते. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार राजाभाऊ वाजे, देवयानी फरांदे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, माजी आमदार माणिकराव कोकाटे, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. भगीरथ शिंदे, सुरेश पाटील, जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आबासाहेब कोठावदे, नगराध्यक्ष किरण डगळे, माणिक बोरस्ते, डॉ. सुनील ढिकले, युवा नेते उदय सांगळे, त्र्यंबक गायकवाड, अश्विनी वारुंगसे, पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण वाजे, उपाध्यक्ष अरुण वारुंगसे आदींसह पुरस्कारार्थी व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.जिल्ह्याच्या सहकाराचे शुद्धीकरण करा : लहवितकरजिल्ह्यातील नेत्यांनी सहकार चळवळ मोडीत काढली असून, त्याचे सहकारमंत्र्यांनी शुद्धीकरण करावे, अशी अपेक्षा महंत रामकृष्णदास महाराज लहवितकर यांनी व्यक्त केली. एकेकाळी नाशिक जिल्हा सहकार क्षेत्रात अग्रेसर होते; मात्र आता वाईट अवस्था आल्याचे ते  म्हणाले. पेशवे पतसंस्थेच्या वतीने देशमुख यांच्या हस्ते राजकारण व समाज-कारणात उल्लेखनीय काम केल्याबद्दल माजी राज्य मंत्री तुकाराम दिघोळे, शैक्षणिक क्षेत्रासाठी नीलिमा पवार, तर संतसाहित्य क्षेत्रासाठी महंत महामंडलेश्वर डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर यांना ‘श्रीमंत भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुख