शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त ‘एलईडी’ प्रकरणविधी व न्याय विभागाकडे?

By admin | Updated: July 21, 2016 23:10 IST

कायदेशीर गुंतागुंत : सर्व प्रक्रियाच रद्द करण्याची शिफारस

नाशिक : वादग्रस्त ‘एलईडी’ प्रकरणाची व्याप्ती, आर्थिक बाबी आणि उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय यामुळे कायदेशीर गुंतागुंत निर्माण झाल्याने महापालिकेचे माजी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सदर प्रकरण नगरविकास विभागाकडे पाठवत संपूर्ण प्रक्रियाच कलम ४५१ नुसार विखंडित करण्याची शिफारस केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. नगरविकास विभागानेही सदर प्रकरण राज्याच्या विधी व न्याय विभागाकडे पाठविले असल्याचे समजते. सुमारे २०२ कोटी रुपये खर्चाच्या ‘एलईडी’ प्रकरणी निवृत्त उपअभियंता आगरकर यांची चौकशी लावण्याच्या प्रस्तावावर बुधवारी (दि.२०) झालेल्या महापालिकेच्या महासभेत जोरदार चर्चा होऊन महापौरांनी याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीचा आता अधिकाऱ्यांपासून संबंधित सहभागी लोकप्रतिनिधींनीही धसका घेतला असून, गुरुवारी त्याचीच महापालिका वर्तुळात चर्चा सुरू होती. दरम्यान, वादग्रस्त ठरलेल्या एलईडी प्रकरणी माजी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी घेतलेल्या धडक निर्णयांचीही माहिती बाहेर येऊ लागली आहे. एलईडी प्रकरणी संपूर्ण निविदाप्रक्रियाच रद्द करण्यासाठी करारामध्ये लवादाचा मुद्दा अंतर्भूत करण्यात आलेला होता. परंतु महापालिकेने हैदराबादच्या एमआयसी कंपनीला ८० कोटी रुपयांची बॅँक गॅरंटी दिली असल्याने आणि अशा परिस्थितीत सदर कंपनीने बॅँक गॅरंटी वटविल्यास महापालिकेचे नुकसान होण्याची भीती होती. त्यामुळेच महापालिकेने जिल्हा न्यायालयात वरिष्ठ स्तर न्यायालयात दावा दाखल करून प्रकरणाला स्थगिती मिळविली. या साऱ्या प्रकरणाबाबत डॉ. गेडाम यांनी शासनाच्या नगरविकास विभागालाही माहिती कळविली असून, महापालिका अधिनियमाच्या कलम ४५१ नुसार शासन प्रक्रिया विखंडित करू शकते, अशी शिफारस केली होती. परंतु प्रक्रिया विखंडित करायची असल्यास लवादाकडे जाणे क्रमप्राप्त होऊन त्याला बराच विलंब लागण्याची शक्यता आहे. या साऱ्या प्रकरणात कायदेशीर गुंतागुंत निर्माण झाल्याने गेडाम यांनी सदर प्रकरण विधी व न्याय विभाग आणि महाधिवक्ता यांच्याकडे पाठविण्याची विनंती केली होती. त्यानुसार नगरविकास विभागाने सदर प्रकरण विधी व न्याय विभागाकडे पाठविले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. (प्रतिनिधी)