शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त डेकाटे पुन्हा नाशिकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 01:21 IST

जिल्हा परिषदेतील आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे यांची शुक्रवारी (दि.१) बदली झाली असून, त्यांच्या जागी नाशिक महापालिकेत अनेक वादग्रस्त निर्णयांमुळे विशेष ठरावाने हकालपट्टी करण्यात आलेले डॉ. विजय डेकाटे यांची जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. बदली होताच डॉ. डेकाटे पदभार स्वीकारण्यासाठी जिल्हा परिषदेत दाखल झाले.

नाशिक : जिल्हा परिषदेतील आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे यांची शुक्रवारी (दि.१) बदली झाली असून, त्यांच्या जागी नाशिक महापालिकेत अनेक वादग्रस्त निर्णयांमुळे विशेष ठरावाने हकालपट्टी करण्यात आलेले डॉ. विजय डेकाटे यांची जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. बदली होताच डॉ. डेकाटे पदभार स्वीकारण्यासाठी जिल्हा परिषदेत दाखल झाले. परंतु, त्यांना पदभार सोपवला नसलाची माहिती सूत्रांनी दिली असून, डेकाटेंची यापूर्वीची वादग्रस्त कारकिर्द पाहता त्यांना रुजू होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागण्याचे संकेत आहेत.  जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे यांची नाशिक जिल्हा परिषदेत चार वर्षे सेवा झाल्याने ते बदलीस पात्र असून, त्यांना बदलीचे आदेश प्राप्त झाले आहेत. राज्यातील सुमारे २२ जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश निर्गमित झाले असून, या आदेशात डॉ. वाघचौरे यांची भंडारा जिल्हा परिषद आरोग्य अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर गेल्यावर्षी नाशिक महापालिकेतून बदली करण्यात आलेले डॉ. विजय डेकाटे यांची नाशिक जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. यापूर्वीही डॉ. डेकाटे यांची जिल्हा आरोग्य अधिकारीपदी बदली झाली होती. परंतु, विविध कारणांनी वादग्रस्त असलेले डॉ. डेकाटे यांची कारकिर्द लक्षात घेऊन त्यांना जिल्हा परिषद पदाधिकाºयांकडून विरोध झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी त्यांना रुजू करून घेतले नव्हते. असे असताना, यावेळीही शासनाकडून नियमित बदली प्रक्रियेतून नाशिक जिल्हा परिषदेत रुजू होण्यासाठी आलेल्या डेकाटे अद्याप पदभार सोपविण्यात आलेला नाही. त्यामुळे यावेळी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.डेकाटे यांची महापालिकेतील कारकीर्दनाशिक महापालिकेत डॉ. विजय डेकाटे यांची कारकीर्द सिंहस्थ साहित्य खरेदी, सफाई कामगारांविषयीचे धोरण, घंटागाडी ठेकेदारांशी असलेल्या संबंधांमुळे वादग्रस्त राहिलेली आहे. त्यामुळे तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी डेकाटेंची विभागीय चौकशी करून डेकाटेंची उचलबांगडी करीत वैद्यकीय अधीक्षकपदाचा प्रभारी कार्यभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला होता. या कार्यकाळातही वैद्यकीय अधिकारी कर्मचाºयांच्या गैरहजेरीमुळे महिलेची प्रसूती रिक्षात झाल्याचा प्रकार घडल्याने तत्कालीन आयुक्तांनी डेकाटे यांना मनपा सेवेतून कार्यमुक्त केले होते.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद