येवला : येथील स्वर्गीय रामनारायण काबरा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गरजूंना दररोज भोजन पाकिटांचे वाटप केले जात आहे.ट्रस्टने शहरातील विधवा, निराधार, गरजूंची अन्नाची गरज ओळखून जानेवारी महिन्यापासून हा उपक्र म सुरू केला होता. कोरोनामुळे संचारबंदी लागू झाल्याने बाजारपेठा व छोटे व्यवसाय बंद पडल्याने कष्टकऱ्यांची उपासमार होऊ लागली. अशा कष्टकऱ्यांनाही ट्रस्टकडून या उपक्रमाचा लाभ दिला जात असल्याचे ट्रस्ट अध्यक्ष पुरुषोत्तम काबरा यांनी सांगितले. ट्रस्टच्या कार्यालयातून सेक्रेटरी महेश काबरा, खजिनदार सुनील काबरा व सहकारी मोफत भोजन पाकिटे वितरित करीत आहेत.
येवल्यात काबरा ट्रस्टतर्फेअन्नदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 23:14 IST