शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

तीन अभियंत्यांसह ठेकेदारास दोन वर्षे शिक्षा

By admin | Updated: August 3, 2015 23:22 IST

स्वागत कमान दुर्घटना : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सिद्ध

नाशिक : जानेवारी २०११ मध्ये सौभाग्यनगर, देवळाली कॅम्प येथील महापालिकेने उभारलेली स्वागत कमान कोसळून तिघांचा बळी गेल्याच्या दुर्घटनेप्रकरणी जिल्हा न्यायालयाने महापालिकेच्या तीन अभियंत्यांसह ठेकेदारास प्रत्येकी दोन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या चौघा आरोपींविरुद्ध कामात हलगर्जीपणाचा ठपका ठेवतानाच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने सदर निकाल दिला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एन. पाठक यांनी सोमवारी स्वागत कमानीसंदर्भातील खटल्यात निकाल दिला. न्यायालयाने महापालिकेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय मुकुंद धर्माधिकारी, उपअभियंता सुनील श्रावण रौंदळ, शाखा अभियंता मोहमंद खलिद मोहमंद गौस आणि सरकारी ठेकेदार किशोर मुरलीधर एखंडे यांना दोषी ठरवत त्यांना प्रत्येकी दोन वर्षे सक्तमजुरी, १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारवासाची शिक्षा सुनावली. तर ठेकेदाराकडील सुपरवायझर आनंद गोमाजी चौरे व संजय बेनदेव म्हस्के यांची निर्दोष मुक्तता केली. देवळाली कॅम्प येथील लॅमरोडवरील सौभाग्यनगर येथे महापालिकेमार्फत स्वागत कमान उभारण्याचे काम सुरू होते. दि. १८ जानेवारी २०११ रोजी सदर स्वागत कमान कोसळली. यावेळी कमानीखालून जाणाऱ्या रिक्षावर (एमएच १५ - ५५२९) कमानीचा वरचा भाग कोसळल्याने रिक्षा दबली जाऊन त्यात रिक्षाचालक सुरेश दादा पगारे आणि प्रवासी धनश्री विजय घायवटे यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर आनंदा बुद्धपाल नन्नावरे हा लहान मुलगा गंभीर जखमी झाला होता. नंतर जखमी आनंदा नन्नावरेचाही उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सदर दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या दुर्घटनेचे पडसादही उमटले होते. महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या निकृष्ट कामकाजाबद्दल लोकप्रतिनिधींनी लक्षही वेधले होते. दरम्यान, पोलिसांनी सदर दुर्घटनेबद्दलचा खटला न्यायालयात दाखल केल्यानंतर त्यावर सुमारे साडेचार वर्षे सुनावणी चालली. न्यायालयाने या प्रकरणात १२ साक्षीदार तपासले. तीन अभियंत्यांसह ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. ए. जे. देशमुख यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)