शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका भरणार कंत्राटी वाहनचालक

By admin | Updated: September 17, 2016 00:42 IST

अपुरी संख्या : ६० चालकांसाठी मागविल्या निविदा

नाशिक : वाहने आहेत पण चालक नाहीत, अशी स्थिती महानगरपालिकेची बनलेली आहे. वाढत्या आस्थापना खर्चामुळे नोकरभरतीस मनाई आहे. त्यामुळे मनपाने अखेर वाहनचालकांचे कंत्राट देण्याचा निर्णय घेतला असून, सुमारे ६० वाहनचालकांसाठी पावणे दोन कोटी रुपये खर्चाची निविदा काढली आहे. निवृत्तीमुळे घटत चाललेल्या वाहनचालकांच्या संख्येमुळे यापुढे महापालिकेच्या वाहनांच्या चाव्या कंत्राटी चालकांच्या हाती असणार आहेत. महापालिकेत पदाधिकाऱ्यांसह अधिकारी वर्गासाठी वाहनांचा वापर केला जातो. याशिवाय विविध विभागांसाठीही वाहनांचा वापर होतो. सद्यस्थितीत महापालिकेकडे विविध प्रकारची २३० वाहने असून, त्यातील ३६ वाहने लिलावात निघण्याच्या तयारीत आहेत. सुमारे ३० वाहने ही वाहनचालकांअभावी पडून आहेत. त्यांचा वापर केला जात नाही. महापालिकेकडे आजमितीला १५५ वाहनचालक आहेत, तर वाहनांची संख्या लक्षात घेता सुमारे ४५ ते ५० वाहनचालकांची आवश्यकता आहे. प्रामुख्याने, अग्निशामक दलाला वाहनचालकांची मोठ्या प्रमाणावर निकड भासते. दलाकडे पुरेसे वाहनचालक नसल्याने चालकांना तीन सत्रांत काम करावे लागते. त्यामुळे कामाचा ताण वाढतो. अग्निशामक दलाने वाहनचालकांची मागणी वारंवार केलेली आहे. याशिवाय, अन्य विभागांकडूनही वाहनचालकांची मागणी होत असते. वाहनचालकांच्या निवृत्तीचेही प्रमाण वाढत चालल्याने कर्मचारीसंख्या घटत चाललेली आहे. त्यामुळे वाहनचालक पुरविण्याबाबत यांत्रिकी विभागाला नेहमीच पेच पडलेला असतो. वाहनचालकांची निकड लक्षात घेऊन महासभा व स्थायी समितीने कंत्राटी पद्धतीने वाहनचालक भरतीला मान्यता दिली होती. त्यानुसार, यांत्रिकी विभागाने ६० वाहनचालक भरण्यासाठी कंत्राट देण्याचे ठरविले असून, त्यासाठी एक कोटी ६० लाख रुपये खर्चाची निविदा काढली आहे. (प्रतिनिधी)