शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक बांधकाम खात्यात ठेकेदारांच्या बिलांचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:51 IST

सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी व कामे घेणारे ठेकेदारांचे संगमनत आजवर सर्वश्रुत असून, त्यात आता नवीन प्रकरणाची भर पडली आहे.

ठळक मुद्देझालेल्या (?) कामांबाबत शंका निर्माण पोलिसात तक्रार दाखल करण्याचा इशाराठेकेदाराच्या ताब्यात सोयीसाठी

नाशिक : सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी व कामे घेणारे ठेकेदारांचे संगमनत आजवर सर्वश्रुत असून, त्यात आता नवीन प्रकरणाची भर पडली आहे. जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने करण्यात आलेल्या शेकडो कामांच्या मोजमाप पुस्तिकाच (एम.बी.) गायब झाल्या असून, परिणामी झालेल्या (?) कामांबाबत शंका निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे मोजमाप पुस्तिका ताब्यात ठेवण्याची जबाबदारी संबंधित अधिकाºयांची असताना अनेक वर्षे उलटूनही त्यांनी मोजमाप पुस्तिका जमा न केल्याने त्यांना स्मरणपत्रे पाठवूनही उपयोग होत नसल्याचे पाहून कार्यकारी अभियंत्यांनी आता त्या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्याचा इशाराच दिला आहे.सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून आदिवासी विकास विभाग व इतर शासकीय विभागांची विकासकामे करून घेतली जातात. संपूर्णत: बांधकाम खात्याच्या नियंत्रणाखाली ठेकेदारांकरवी करून घेतल्या जाणाºया कामांचे कार्यारंभ आदेश दिल्यानंतर सुरू होणाºया प्रत्येक कामाची कामनिहाय नोंद ठेवणारी मोजमाप पुस्तिका ठेवली जाते. त्या त्या कामाची जबाबदारी सोपविलेल्या कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, सहायक अभियंत्यांनी आपल्या अखत्यारितील कामाची प्रगती व त्याचे या पुस्तिकेत वेळोवेळी मोजमाप नोंदविणे अपेक्षित असते. बहुतांशी वेळेस ही पुस्तिका काम करणाºया ठेकेदाराच्या ताब्यात सोयीसाठी ठेवली जाते. काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित अधिकाºयाने कार्यारंभ आदेशाप्रमाणे कामकाज झाले किंवा नाही त्याची प्रत्यक्ष स्थळभेट देऊन पाहणी करणे व तशी मोजमाप करून पुस्तिकेत नोंद करणे व या पुस्तिकेतच कामाचे बिल तयार केले जाते. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उत्तर विभागाच्या अखत्यारित येणाºया नाशिक जिल्ह्णातील दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या आदिवासी तालुक्यात गेल्या काही वर्षांत करण्यात आलेल्या कामाच्या मोजमाप पुस्तिकाच आता सार्वजनिक बांधकाम खात्याला सापडत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात ही कामे झाली किंवा नाही याचा उलगडा करण्याचे कोणताही महत्त्वाचा पुरावा सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सध्या उपलब्ध नसल्याने या कामाचे बिले अदा करण्याचे कामही पूर्णत: ठप्प झाले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ताब्यात असलेल्या कागदपत्रांच्या आधारे कार्यकारी अभियंत्यांनी माहिती संकलित केली असता, जवळपास ३३५ कामांच्या मोजमाप पुस्तिका गायब झाल्या असून, संबंधित अधिकाºयांना वारंवार विचारणा करूनही त्यांच्याकडून वा काम करणाºया ठेकेदाराकडून कोणतीही दाद दिली जात नसल्याने या कामांच्या भवितव्याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.पोलिसांत तक्रार करण्याचा इशाराअनेक वर्षे उलटूनही अभियंत्यांनी कामांच्या मोजमाप पुस्तिका सादर न केल्याने त्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याने त्यांच्याशी पत्रव्यवहार करून पुस्तिका सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत, परंतु त्याला दाद मिळत नसल्याचे पाहून अखेर उत्तर विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी याबाबत वृत्तपत्रातून जाहीर प्रकटन प्रसिद्ध करून जवळपास ७२ अभियंत्यांच्या नावानिशी यादी व त्यांच्याकडील मोजमाप पुस्तिका क्रमांक जाहीर करून येत्या दहा दिवसांत त्या सादर करण्याचे आवाहन केले आहे. मुदतीत मोजमाप पुस्तिका न आल्यास संबंधितांविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याबरोबरच ज्या कामांच्या मोजमाप पुस्तिका गायब झाल्या आहेत त्या कामांचे देयके अदा न करण्याची भूमिका घेतली आहे. थेट वर्तमानपत्रातूनच अधिकाºयांना जाहीर आवाहन करण्याची वेळ सार्वजनिक बांधकाम खात्यावर आल्याने या खात्याच्या कारभाराची जाहीर चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या साºया प्रकारात अधिकारी व ठेकेदारांचे संगनमत स्पष्ट होत आहे.