सटाणा:पाणी व स्वच्छता विभागाच्या कंत्राटी कर्मचार्यांसाठी आऊटसोर्सिंग एजन्सी नेमण्याला गट संसाधन केंद्रातील कर्मचार्यांनी विरोध दर्शवला आहे. शासनाने एजन्सी नेमल्यास आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा दिला आहे. याबाबत तालुका स्तरावर पाणी व स्वच्छता कक्षात जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत असलेल्या गट संसाधन केंद्रातील बागलाण तालुक्यातील कर्मचार्यांनी आमदार दिलीप बोरसे यांना निवेदन सादर केले.राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात गेल्या नऊ वर्षापासून कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहे पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय मुंबई यांच्यामार्फत कंत्राटी कर्मचारी यांच्यासाठी आऊटसोर्सिंग एजन्सी मिळण्यासाठी प्रक्रि या सुरू आहे. मात्र, सदर एजन्सी नेमन्यास राज्यातील कंत्राटी कर्मचारयांचा विरोध आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने एजन्सी नेमणूक करण्यात येऊ नये, तालुकास्तरावर काम करणारी बीआरसी व सीआरसी यांच्यासाठी सध्या कार्यरत असलेल्या पद्धतीने कायम ठेवण्यात यावी. आऊटसोर्सिंग एजन्सीमुळे राज्यातील कामावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच सध्या काम करत असलेल्या कर्मचार्यांची नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. एजन्सी नेमणे या विभागात नऊ वर्षापासून काम करणारे कर्मचारी यांच्यावर अन्यायकारक आहे. यापूर्वी अन्य विभागाचा अनुभव पाहता एजन्सीकडून नेमलेल्या कर्मचार्यांची आर्थिक व मानिसक पिळवणूक होते. त्यामुळे एजन्सीची नेमणूक करण्यात येऊ नये असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर संघटनेचे जिल्हा सचिव वैभव पाटील, कैलास शेंगदाणे सीमा जाधव आदींच्या सह्या आहेत.
कंत्राटी कर्मचार्यांचा आउटसोर्सिंगला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 01:25 IST
सटाणा:पाणी व स्वच्छता विभागाच्या कंत्राटी कर्मचार्यांसाठी आऊटसोर्सिंग एजन्सी नेमण्याला गट संसाधन केंद्रातील कर्मचार्यांनी विरोध दर्शवला आहे. शासनाने एजन्सी नेमल्यास आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा दिला आहे. याबाबत तालुका स्तरावर पाणी व स्वच्छता कक्षात जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत असलेल्या गट संसाधन केंद्रातील बागलाण तालुक्यातील कर्मचार्यांनी आमदार दिलीप बोरसे यांना निवेदन सादर केले.
कंत्राटी कर्मचार्यांचा आउटसोर्सिंगला विरोध
ठळक मुद्देनोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे